बेळगाव : नागरिकांच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी देत पोलीस आणि जनतेतील विश्वासाचे नाते दृढ करण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी ‘घरोघरी पोलीस’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देत आपत्कालीन सेवांचे महत्त्वाचे संपर्क क्रमांक असलेले स्टिकर घराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येत आहेत. त्यामुळे आपत्ती, गुन्हा किंवा …
Read More »कोका प्रकरणातील साक्षीदाराची निर्घृण हत्या
हिडकल धरणाजवळ तलवारीने सपासप वार, १० ते ११ जणांविरुद्ध गुन्हा बेळगाव : कोका प्रकरणातील साक्षीदार असलेल्या एका युवकाची हिडकल धरण परिसरात तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात आणखी एक युवक जखमी झाला असून, या प्रकरणी १० ते ११ जणांविरुद्ध …
Read More »मच्छे येथील व्ही. एस. पाटील सरकारी शाळेत प्रा. वैदेही जाधव यांचे आरोग्याविषयी मार्गदर्शन
श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजनेच्यावतीने विशेष कार्यक्रम बेळगांव : मच्छे येथील व्ही. एस. पाटील सरकारी शाळेत ‘स्वास्थ्य संकल्प’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचे महत्त्व तसेच तंबाखू, मद्य आणि अमलीपदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या …
Read More »युनियन जिमखाना गोळीबार प्रकरण : आरोपींवर गुंडा ॲक्ट
बेळगाव : कॅम्प परिसरातील युनियन जिमखाना येथे झालेल्या थरारक गोळीबाराच्या प्रयत्नानंतर बेळगाव शहर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील आरोपींवर गुंडा ॲक्ट तसेच तडीपारी (हद्दपारी) सारखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिला. शहरातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांची कोणतीही …
Read More »एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ; अर्ज वाटपाची अंतिम तारीख आता ८ ऑगस्ट
बेळगाव : भारतीय निवडणूक आयोगाने कर्नाटकसह दिल्ली, पंजाब आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार एसआयआरअंतर्गत मतदार अर्जांचे वाटप आणि संकलन करण्याची अंतिम मुदत आता ८ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र …
Read More »चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र बूथ व वॉर्डसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथील ग्रामस्थांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी खानापूरच्या तहसीलदारांना निवेदन देऊन गावासाठी स्वतंत्र बूथ व वॉर्ड ची मागणी केली होती. आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते व चन्नेवाडीचे रहिवाशी धनंजय पाटील यांनी बेळगावचे माननीय जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र बूथ व वॉर्डसाठी …
Read More »खडेबाजारातील उघडा खड्डा ठरत आहे जीवघेणा; विजेच्या उघड्या केबलमुळे महिलेस शॉक, नागरिकांमध्ये संताप
बेळगाव : खडेबाजार येथील मोनप्पा पान शॉपसमोर खोदलेला खड्डा आणि त्यामध्ये उघड्यावर पडलेल्या विद्युत केबलमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या माहितीनुसार, याच ठिकाणी एका महिलेला विजेचा शॉक बसल्याची घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या धोकादायक परिस्थितीबाबत तक्रार केल्यानंतर हेस्कॉमकडून …
Read More »सुळगा (हिं.) येथे उस्ते – सत्तरी गोवा येथील वारकरी दिंडीचे उत्साहात स्वागत
पाचव्या वर्षीही वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था सुळगा (हिं.) : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी निघालेल्या गोव्यातील उस्ते-सत्तरी, वाळपई येथील श्रीराम माऊली वारकरी मंडळाच्या दिंडीचे बुधवारी सुळगा (हिं.) येथे ग्रामस्थांनी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. यावेळी वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करून, दिवंगत सामाजिक कार्यकर्ते शट्टूप्पा (बाळू) पाटील यांनी सुरू केलेली सेवाभावाची परंपरा त्यांच्या …
Read More »कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीची केंद्राने तातडीने पाहणी करावी
पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे पत्र बंगळूर : राज्यात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने तज्ज्ञांचे पथक कर्नाटकमध्ये पाठवावे, अशी मागणी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या तज्ज्ञ …
Read More »अपार्टमेंटधारकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी नवा कायदा; राज्य सरकारकडून सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू
बंगळूर : अपार्टमेंटमधील रहिवासी आणि घरखरेदीदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार ‘कर्नाटक अपार्टमेंट (मालकी व व्यवस्थापन) विधेयक २०२५’ लागू करण्याच्या तयारीत आहे. मात्र हे विधेयक अंतिम करण्यापूर्वी राज्यातील अपार्टमेंट असोसिएशन, रहिवासी आणि संबंधित घटकांकडून सूचना व हरकती मागविण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. जवाहरलाल नेहरू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta