बेळगाव : कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या वतीने मंगळूर येथील यमिकेरे जलतरण तलावात आयोजित करण्यात आलेल्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई केली. स्पर्धेत दिशा होंडी (जेएसडब्ल्यू अकादमी) हिने 50 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात 28.74 सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक, 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये …
Read More »एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्यावर ‘एसआयआर’ निरीक्षकपदाची जबाबदारी
बेळगाव : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे पक्षाने आणखी एक महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी त्यांची राज्यातील ‘एसआयआर’ (Special Intensive Revision) प्रक्रियेच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. एआयसीसीच्या वतीने गोवा आणि इतर राज्यांच्या प्रभारी म्हणून प्रभावीपणे …
Read More »दुभाजकाला कार आदळून भीषण अपघात; आईसह दोन मुलांचा मृत्यू, पती गंभीर
विजयपूर (प्रतिनिधी) : विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील मनगुळीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर शुक्रवारी झालेल्या भीषण कार अपघातात एका कुटुंबातील आई आणि दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर कुटुंबप्रमुख गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची ओळख सत्यवेणी (३८), त्यांचा मुलगा हरिवेंकटराम (२०) आणि जश्वंत (१८) अशी झाली आहे. तर राघवेंद्र …
Read More »बेंगळूरूमध्ये तिहेरी हत्याकांड: आई, आजी आणि मामाची हत्या करून तरुणाची आत्महत्या
बेंगळुरू : कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरूमध्ये धक्कादायक तिहेरी हत्येची घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने स्वतःच्या आई, आजी आणि मामाची धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना बेंगळुरूतील कोट्टिगेपाळ्या येथील अय्यप्पा स्वामी मंदिराजवळ घडली. मृतांमध्ये मंगळम्मा (आई), नंजम्मा (आजी) आणि सतीश (मामा) यांचा समावेश आहे. …
Read More »कायम वास्तव प्रमाणपत्र देण्याचा राज्य सरकारला पूर्ण अधिकार प्रियांक खर्गे यांचा भाजपवर हल्लाबोल
बंगळूर : राज्य सरकारला कायम वास्तव (पीआरसी) प्रमाणपत्र देण्याचा पूर्ण अधिकार असून त्यासाठी आवश्यक नियम व शासकीय आदेश जारी करण्याचा अधिकारही सरकारकडे आहे, असे राज्याचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी स्पष्ट केले. बंगळुरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना खर्गे म्हणाले, “शासन म्हणजे कायदे करणे. त्यानुसार आम्ही कायदे करून शासकीय आदेश जारी करणार …
Read More »येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीची एसआयआर प्रक्रियासंबंधी जनजागृती
महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन: शेतवाडीतील रस्तेदुरूस्तीसाठी पीडीओना निवेदन देणार येळ्ळूर : कर्नाटक राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पुनर्रचना (SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर, येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने ब्रम्हलिंग मंदिर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवीन नावांची नोंदणी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांचे मतदान टिकवून ठेवण्यासाठी जनजागृती करणे …
Read More »कर्नाटकच्या निवासी प्रमाणपत्र नियमाला आक्षेप; शोभा करंदलाजेंची अमित शाहांकडे हस्तक्षेपाची मागणी
बंगळूर : कर्नाटक सरकारने नुकत्याच लागू केलेल्या ‘कर्नाटक कायमस्वरूपी निवासी प्रमाणपत्र (पीआरसी) – २०२६’ नियमावलीवर केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हा निर्णय भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांना धक्का देणारा असून देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठीही धोकादायक ठरू शकतो, असा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित …
Read More »आरएसएसच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीला बेळगावात प्रारंभ
बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) तीन दिवसीय अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीला शुक्रवारी बेळगावातील अनगोळ येथील संत मीरा शाळेत प्रारंभ झाला. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे उद्घाटन झाले. या बैठकीला सर्व सहसरकार्यवाह, विविध कार्यविभागांचे अखिल भारतीय प्रमुख, कार्यकारिणी सदस्य, क्षेत्रीय …
Read More »बेळगाव जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालये रविवारीही सुरू; १२ जुलैला मिळणार नोंदणी सेवा
बेळगाव : मालमत्ता नोंदणीसह इतर नोंदणीसंबंधित कामांसाठी नागरिकांना दिलासा देत कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, १२ जुलै २०२६ (रविवार) रोजी बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्व उपनिबंधक (सब-रजिस्ट्रार) कार्यालये नियमितपणे सुरू राहणार असून सर्व नोंदणी सेवा उपलब्ध राहतील. राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, कर्नाटक नोंदणी नियम, १९६५ मधील …
Read More »जंगली आळंबी खाल्ल्याने ९ जणांची प्रकृती बिघडली; गर्भवतीला बेळगावला हलविले
चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील उमराणी गावात शेतात उगवलेली जंगली आळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ९ जणांची प्रकृती बिघडल्याची घटना शुक्रवारी घडली. सर्वांवर चिक्कोडी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून एका गर्भवती महिलेला पुढील उपचारांसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील काम आटोपल्यानंतर जिद्दीमणी व कोळी कुटुंबातील सदस्यांनी शेतात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta