Sunday , August 23 2026
Breaking News

विद्याभारती राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेला प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : लक्ष्मीनगर हिंडलगा येथील जनकल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्लिश मीडियम शाळेच्या सभागृहात विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा गणेशपुर शाळा आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय मलखांब व रोप मलकांब स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला, 4 जिल्ह्यातील पन्नासहून अधिक मुलामुलींनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक समाजसेवक नागराज पाटील, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, विद्याभारती बेळगाव जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर, सचिव डॉ एस व्ही कुलकर्णी, संत मीरा शाळेचे अध्यक्ष डॉ विजय गोवेकर, मुख्याध्यापिका आरती पाटील, शाळा सुधारणा समिती सदस्य रामनाथ नाईक, महेश नरगुंदकर, विद्याभारती जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख चंद्रकांत पाटील, स्पर्धा सचिव श्रीकांत कांबळे, शुभांगी काकतकर, माधवी हरेर, मंजुनाथ भुजंगणावर आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती ओंकार भारत माता फोटो पूजन, मलखाब व श्रीफळ वाढून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील यांनी प्रास्ताविक करीत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषणे केले. याप्रसंगी शकुंतला हुनगुद, पद्मजा थांबज, अभिषेक पटवर्धन, अश्विनी तुडवेकर, पंच सुरज देसूरकर, स्वप्निल पाटील, अभय पिसाळे, श्री चौगुले, दर्शन के के, संतोष पिसे, मोहन बी एन, मारुती पी एम, आदी उपस्थित होते. या स्पर्धेत बेळगाव धारवाड रामनगर बेंगलोर शाळेतील प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींनी भाग घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा जाधव तर आरती पाटील यांनी आभार मानले.

फोटो ओळी
बेळगांव मलखाबची प्रात्यक्षिके सादर करताना संत मीरा शाळेचे खेळाडू शेजारी नागराज पाटील परमेश्वर हेगडे माधव पुणेकर, एस व्ही कुलकर्णी, आरती पाटील डॉ विजय गोवेकर व इतर

About Belgaum Varta

Check Also

रेनाॅटस् वेलनेसच्या आरोग्य शिबीरास मोठा प्रतिसाद

Spread the love  बेळगांव : स्कायहायच्या सौजन्याने येथील रेनॉटस् वेलनेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *