
येळ्ळूर : येथील ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीचा अभिषेक सोहळा श्रावण मासानिमित सालाबादप्रमाणे मंगळावर दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित सकाळी ८ वाजता कलस मिरवणूक श्री चांगळेश्वरी मंदिरपासून निघणार असून मिरवणूकीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांनी सकाळी ७.३० वाजता मंदिरमध्ये उपस्थित रहावे. मिरवणुकीनंतर सकाळी ९ वाजता अभिषेक होणार आहे. तरी भाविकांनी अभिषेक व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री चांगळेश्वरी अभिषेक मंडळ व श्री चांगळेश्वरी युवक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta