Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

बेंदूर सणानिमित्त बोरगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जनावरांचे प्रदर्शन

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक बेंदूर सणानिमित्त बोरगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सुनील नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव येथे सोमवारी (ता. २९) जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. विविध गटासाठी आकर्षक बक्षीसे देण्यात येणारअसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तात्यासाहेब बसन्नावर यांनी दिली. बोरगाव येथील आयोजित बैठकीत ते बोलत होते. बसन्नावर म्हणाले, …

Read More »

बेळगाव येथे ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून भव्य हॉकी मैदान साकारणार

  खासदार जगदीश शेट्टर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाची सकारात्मक बैठक! बेळगाव : बेळगाव हे क्रीडा क्षेत्रातील, विशेषतः हॉकीचे ‘पंढरी’ म्हणून ओळखले जाते. बेळगावच्या रक्ताने नेहमीच हॉकीचा वारसा जपला आहे. पूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हॉकीचे सामने खेळवले जात होते. हाच ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी आणि बेळगावच्या खेळाडूंना हक्काचे मैदान …

Read More »

कब्बूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात; कार दरीत कोसळून दोघांचा मृत्यू

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर टोलनाका परिसरात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात कार खोल दरीत कोसळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलीकवाड येथील चार जण कारमधून घटप्रभाच्या दिशेने प्रवास करत होते. कब्बूर टोलनाक्याजवळ पोहोचताच …

Read More »

ईडीच्या कारवाईनंतर वाय. मंजुनाथ बेळगावात; कायदेशीर तयारीला वेग

  बेळगाव : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अलीकडील कारवाईनंतर उद्योजक वाय. मंजुनाथ हे तातडीने बेळगावात दाखल झाले आहेत. शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांनी कायदेशीर सल्लामसलत आणि पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, मंजुनाथ यांनी प्रसिद्ध सनदी लेखापरीक्षक (सीए) पी. जी. गाळी यांना तातडीने आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. …

Read More »

हेल्मेट क्रांतीला बेळगावकरांचा प्रतिसाद; तब्बल 91.80 टक्के दुचाकीस्वार झाले सुरक्षित!

  बेळगाव : रस्ते अपघातांमधील मृत्यू आणि गंभीर दुखापतींचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने हाती घेतलेल्या हेल्मेट जनजागृती अभियानाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. अभियानानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरातील तब्बल 91.80 टक्के दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करत असल्याचे आढळून आले असून, बेळगावकरांनी सुरक्षिततेचा संदेश स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत …

Read More »

अन्नभाग्य योजनेत मोठा बदल; 13 लाखांहून अधिक अपात्र लाभार्थ्यांवर गंडांतर!

  बेंगळुरू : राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत आता अन्नभाग्य योजनेवरही सरकारची करडी नजर पडली आहे. गृहलक्ष्मी आणि गृहज्योती योजनांमध्ये सुधारणा केल्यानंतर सरकारने अन्नभाग्य योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला असून, सुमारे 13 ते 14 लाख अपात्र बीपीएल कार्डधारकांना यादीतून हटविण्याची तयारी सुरू झाली आहे. अन्न …

Read More »

राज्यातील पालकमंत्र्यांची नियुक्त्या; सतीश जारकीहोळी यांच्याकडे तीन जिल्ह्यांची जबाबदारी

  बेंगळुरू : राज्यातील विकासकामांना गती देणे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाशी प्रभावी समन्वय राखण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांना विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली असून यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. राजधानी बेंगळुरूसह राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी वरिष्ठ मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहे. बेळगाव, धारवाड …

Read More »

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चारा पाण्याच्या शोधात मेंढपाळांचे कुटुंबीयांसह स्थलांतर सुरू

  निपाणी (वार्ता) : जून महिना संपत आला तरी तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे चारा आणि पाण्याच्या शोधात मेंढपाळांना कुटुंबासह भटकंती करावी लागत असून चारा उपलब्ध होईल तेथे शेतात तात्पुरता मुक्काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल होत असला तरी परिसरात अपेक्षित पाऊस झालेला …

Read More »

तलावातील पाणी पातळी खालावल्याने पाणी काटकसरीने वापरण्याचे नगरपालिकेचे आवाहन

  निपाणी (वार्ता) : वेदगंगा नदी आणि येथील जवाहर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली. अद्याप मोठा पाऊस न झाल्याने शिरगुप्पी ओढ्यातील जल स्तोत्र सुरू झालेले नाही. परिणामी तलावातील पाणी गढूळ गाळयुक्त बनले आहे. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी अधिक वेळ लागत असून सर्व प्रभागात एकाच वेळी पाणी देणे कठीण झाले …

Read More »

“मराठी असेल तिथे व्यापार करा” आवाहनानंतर शुभम शेळके यांच्याविरोधात गुन्हा

  बेळगाव : “मराठी असेल तिथे व्यापार करा” असे आवाहन केल्याप्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते शेळके यांच्याविरोधात टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आवाहनामुळे भाषिक तेढ निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शेळके यांनी भारतीय संविधानातील …

Read More »