Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

    बेळगाव : समतेचे पुरस्कर्ते, बहुजनांचे उद्धारकर्ते आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ‘महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव’ यांच्या वतीने युवा समिती कार्यालयात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समितीचे खजिनदार विनायक कावळे यांच्या …

Read More »

सदलग्यातील मोहरम एक सर्वव्यापी उत्सव

  सदलगा : येथील ग्रामदैवत हजरत ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब शमनामीरच्या भव्य आणि प्रशस्त दर्गा परिसरात सदलगा शहरातील तसेच उपनगरांतील पीर-पंजे तथा नालसाब भेटीच्या शेवटच्या दिवसांचा मोहरमचा कार्यक्रम अतिशय उत्साहात, रणहलगी, झांज,  ढोल ताशाच्या  दणदणाटात साजरा झाला. प्रमुख दर्गा, दर्गा चौक, गांधी रोड वरील मोठ्ठा मठ, लहान मठ येथील अर्ध चंद्राकृती …

Read More »

पाही व्हाइब्स फाउंडेशन, शक्ती सामर्थ्य फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; वाचन संस्कृतीला चालना

  बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी या उद्देशाने पाही व्हाइब्स फाउंडेशन आणि शक्ती सामर्थ्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. २५) सदाशिवनगर येथील शासकीय शाळा क्रमांक २२ मध्ये पुस्तक वाटप उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके वितरित …

Read More »

आर. सर्विसेस डेव्हलपर्स बेळगावच्या संचालिका डॉ. सौ. राजश्री राजू तुडयेकर यांच्याकडून सावगाव शाळेला संगणक भेट

  बेळगाव : आर. सर्व्हिसेस डेव्हलपर्स बेळगावच्या संचालिका डॉ. राजश्री राजू तुडयेकर यांच्याकडून सावगाव येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला संगणक संच देणगी दाखल देण्याचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, सावगाव येथे सागर सावगावकर यांच्या अध्यक्षतेखाली काल गुरुवारी आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून देणगीदार …

Read More »

मुख्यमंत्री निवासस्थानासमोरील धरणे आंदोलन तूर्तास स्थगित; ३० जून रोजी सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक

  सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबतही चर्चा बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मध्यवर्ती समितीची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या २९ जून रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या सुनावणीसंदर्भातही विचारविनिमय झाला. बैठकीनंतर माहिती देताना मध्यवर्ती महाराष्ट्र …

Read More »

काळाच्या पाऊलखुणा: म. मं. ताराराणी कॉलेजमध्ये ई-निवडणुकीचा ‘डिजिटल पॅटर्न’ विद्यार्थिनींनी अनुभवली लोकशाहीची आधुनिक ताकद!

  खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडणूक उत्साहपूर्ण आणि लोकशाही वातावरणात दि. १९ जून रोजी पार पडली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव मिळावा यासाठी ‘EVM Simulator App’ चा वापर करण्यात आला. या निवडणुकीची संपूर्ण तयारी प्रा. जयश्री शिवटनकर मॅडम यांच्या …

Read More »

दिवंगत रावसाहेब पाटील यांचे कार्य प्रेरणादायी

  माजी मंत्री वीरकुमार पाटील; बोरगावमध्ये अभिवादन निपाणी (वार्ता) : सहकार रत्न दिवंगत रावसाहेब पाटील सहकार क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर देत होते. त्यांनी सहकार, शिक्षण, सामाजिक आणि ग्रामीण विकासासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक सहकारी संस्था सक्षम झाल्या आणि शेतकऱ्यांना विकासाची …

Read More »

बेळगाव शहरात जप्त अंमली पदार्थांचा वैज्ञानिक पद्धतीने नाश

  बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या सुमारे ५७.७८ लाख रुपयांच्या अंमली पदार्थांचा गुरुवारी (२५ जून) वैज्ञानिक व नियमानुसार नाश करण्यात आला. पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरोधात दाखल झालेल्या २४ प्रकरणांतील जप्त मालाचा यात समावेश …

Read More »

हेस्कॉमच्या खाजगीकरणासह इतर मागण्यासाठीचे रयत संघटनेचे आंदोलन आश्वासनानंतर स्थगित

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी, रोजंदारी मजूर आणि वीज ग्राहकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. त्याला विरोध करण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या बंगळूर येथील फ्रीडम पार्क मध्ये दोन दिवस आंदोलन करण्यात आले. याशिवाय …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे महान समाजसुधारक, शिक्षणप्रेमी व दूरदर्शी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील सर, उपप्राचार्या श्रीमती सोनाली कंग्राळकर व शिक्षक …

Read More »