Monday , August 17 2026
Breaking News

बेळगावात जीवन विद्या मिशनच्या वतीने श्री प्रल्हाद वामनराव पै यांच्या उपस्थितीत रविवारी गुरु पौर्णिमेचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : श्री सद्गुरु श्री वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेच्या वतीने रविवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी दीड वाजेपर्यंत रेल्वे ओव्हर ब्रीज जवळील मराठा मंदिर येथे गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सद्गुरूंचे सुपुत्र श्री प्रल्हाद वामनराव पै जातीने उपस्थित राहून प्रबोधन करणार आहेत, अशी माहिती जीवनविद्या मिशन बेळगाव शाखेचे ज्येष्ठ प्रबोधनकार शंकर बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, महान सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सुपुत्र व अध्यात्मिक विचार परंपरेचे समर्थ वारसदार असलेले श्री प्रल्हाद वामनराव पै हे या आधुनिक काळातील एक दूरदृष्टी असलेले अध्यात्मिक विचारवंत, समाज प्रबोधक, जीवन मार्गदर्शक आणि राष्ट्र निर्माणाचे प्रेरक व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी मांडलेले, वाचनात आणलेले, जीवन विद्या तत्वज्ञान हे कवळ अध्यात्मिक विचार न राहता, सुखी यशस्वी, शांत आणि राष्ट्रनिष्ठ जीवन जगण्याचे शास्त्र म्हणून लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे ठरले आहे.

1985 सालापासून ते जीवन विद्या मिशनच्या कार्यात पूर्ण वेळ समर्पित असून, गेल्या अनेक दशकापासून ते या संस्थेचे लाईफ ट्रस्टी म्हणून मार्गदर्शन करत आहेत. “तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही स्वतः आहात” या मूलतत्वावर आधारित ही जीवनदृष्टी जात, धर्म, पंथ, शिक्षण, आर्थिक स्थर या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन सर्व मानवतेसाठी उपयुक्त ठरले आहे.

बालसंस्कार, गर्भसंस्कार, शालेय संस्कार, शिक्षण अभियान, युवक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, व्यावसायिक व कार्पोरेट क्षेत्रासाठी लाईफ मॅनेजमेंट, औद्योगिक कामगार, पोलीस, कारागृहातील बंदी, शासकीय कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, शेतकरी, महिला आणि कुटुंबासाठी विशेष उपक्रम अशा असंख्य व्यापक क्षेत्रात त्यांनी कार्य चालविले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतात व परदेशात 300 हून अधिक बालसंस्कार केंद्रे, हजारो शाळा, लाखो कुटुंबांमध्ये जीवन विद्या आचरणात आणली जात आहे.

बेळगाव येथे रविवारी होणाऱ्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे प्रबोधन होणार आहे.या कार्यक्रमाला बेळगावसह गोवा, कोल्हापूर, गडहिंग्लज येथील मोठ्या संख्येने नामधारक उपस्थित राहणार आहेत. सोमवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना “यशस्वी व्हा” या विषयावरही श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे मार्गदर्शन लाभणार आहे असेही बांदेकर यांनी सांगितले.

यावेळी जीवन विद्या मिशनचे बेळगाव शाखेचे अध्यक्ष शैलेश शिरोडकर, सचिव सतीश बेकवाडकर, खजिनदार दीपक बिर्जे, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

एसटी समाजाच्या हक्काच्या पैशांचा हिशोब द्यावाच लागेल : डॉ. सोनाली सरनोबत

Spread the love  बेळगाव : कर्नाटक महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील निधीच्या कथित गैरव्यवहार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *