

शेंगातेल २००, भगरीचा दर २०० रुपयांवर; श्रावणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत लगबग
निपाणी (वार्ता) : श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना येथील बाजारपेठेत उपवासाच्या पदार्थांच्या बाजारात महागाईची चाहूल लागली आहे. शेंगातेलाचा दर प्रतिकिलो २०० रुपयांवर, तर भगरीचा दर २१० रुपयांवर पोहोचला आहे. चनाडाळ, शेंगदाणे, साखर आणि गुळाच्या दरातही वाढ झाली आहे. यंदा श्रावणातील उपवास सर्वसामान्यांच्या खिशाला अधिक झळ पोहोचविण्याची चिन्हे आहेत.
श्रावणात उपवासाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात बनवले जातात. या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसारखे अनेक सणअसल्याने बाजारात खरेदीचा उत्साह वाढला आहे.
यंदा शेंगातेलाने महागाईचा उच्चांक गाठला असून बाजारात त्याचा दर प्रतिकिलो २०० रुपयांवर पोहोचला आहे. गुजरातमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेंगदाणा पिकाचे नुकसान होऊन शेंगातेलाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. आवक कमी झाल्याने त्याचे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र पामतेलाच्या आवकीवर युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम झालेला नाही. पंधरवड्यापासून भगरीच्या दरातही वाढ झाली आहे. उत्पादन कमी झाल्याने प्रतिकिलो भगरीचा दर १३० रुपयांवरून वाढून २१० रुपयावर गेले आहेत.
——————————————————————–
उपवासाच्या पदार्थांचे प्रतिकिलो दर
* शाबुदाणा – ७० वरून ८० रुपये
* भगर – २१० रुपये
* शेंगदाणे – १५० रुपये
* साखर – ५५ रुपये
* गूळ – ५५ रुपये
* चनाडाळ – ५५ रुपये
Belgaum Varta Belgaum Varta