Monday , August 17 2026
Breaking News

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण व हॅपीहार्ट फाउंडेशनतर्फे कॅन्टोनमेंट बोर्ड उर्दू शाळेत “ॲनिमिया मुक्त बेळगाव” शिबिर यशस्वी

Spread the love

 

बेळगाव : समाजाच्या आरोग्यविषयक सेवेसाठी राबविण्यात येत असलेल्या “ॲनिमिया मुक्त बेळगाव” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण व हॅपीहार्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्टोनमेंट बोर्ड उर्दू शाळा, बेळगाव येथे ॲनिमिया तपासणी व जनजागृती शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

या शिबिरामध्ये एकूण ५१६ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. ॲनिमियाचे निदान झालेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ लोहयुक्त (आयर्न) गोळ्यांचे वितरण करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांमधील ॲनिमियाचे लवकर निदान करून त्यावर योग्य वेळी उपचार सुरू करणे तसेच त्यांच्या उत्तम आरोग्याला आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या शिबिराचे यशस्वी नियोजन व आयोजन कार्यक्रम अध्यक्षा रोटेरियन शीला पाटील यांनी अत्यंत समर्पितपणे केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक तसेच रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

हा उपक्रम अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी आणि सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

बेळगावीतील मुलांच्या निरोगी भविष्यासाठी शाश्वत सकारात्मक बदल घडविण्याच्या आपल्या ध्येयाने प्रेरित होऊन रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण समाजसेवेचे कार्य सातत्याने पुढे नेत आहे.

About Belgaum Varta

Check Also

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

Spread the love  महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *