कोप्पळ : कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील कुकनूर तालुक्यात भानापूरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर शनिवारी झालेल्या भीषण अपघातात मंत्रालयाकडे निघालेल्या ओम्नी कारमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या अशोक …
Read More »स्मार्टफोनच्या जगात पालकांचे आत्मपरीक्षण; ‘ताराराणी’त मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौतुकास्पद पाऊल!
खानापूर : खानापूर येथील मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात २४ जून २०२६ रोजी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींच्या पालकांसाठी आयोजित करण्यात आलेला मेळावा केवळ एक उपचार न ठरता, पालकांना अंतर्मुख करायला लावणारा एक अनोखा आणि अनुकरणीय सोहळा ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. अरविंद पाटील हे होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि …
Read More »प्राचार्य आनंद आपटेकर यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्काराने’ सन्मानित
कोल्हापूर : १५२ व्या राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त गंगाधर वृत्तपत्राच्या वतीने आयोजित पहिल्या अखिल भारतीय ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज संवाद परिषदे’त बेळगाव सीमाभागातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक व विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय कार्य करणारे प्राचार्य आनंद आपटेकर यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. मोहमेडन एज्युकेशन सोसायटी …
Read More »हलगा मोहरम : हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जिवंत वारसा
करबला ते मानवतेचा संदेश मोहरम हा इस्लामी नववर्षाचा पहिला महिना असला, तरी त्याचे महत्त्व केवळ नववर्षापुरते मर्यादित नाही. इस्लामच्या इतिहासातील करबला येथील बलिदानाच्या स्मरणार्थ हा पवित्र काळ पाळला जातो. इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अन्यायाविरुद्ध दिलेले बलिदान हे सत्य, न्याय आणि मानवतेसाठीच्या संघर्षाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे मोहरम हा …
Read More »सहा महिन्यांत ७२,१८६ सरकारी रिक्त पदे भरणार
भरती प्रक्रियेच्या वेळेत पूर्ततेसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती बंगळूर : राज्यातील सरकारी विभागांतील ७२,१८६ रिक्त पदे पुढील सहा महिन्यांत भरण्याचे लक्ष्य मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी निश्चित केले आहे. भरती प्रक्रिया वेगाने आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी दोन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव तथा विकास आयुक्त …
Read More »राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणी सरचिटणीसांचा राजीनामा, 8 जणांना ठोकल्या बेड्या
नवी दिल्ली : आयोध्येतील राम मंदिरासाठी आलेल्या देणग्यांमध्ये चोरी केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी 8 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने एसआयटी दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारकडे प्राथमिक अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. रामाशंकर उर्फ टिन्नू यादव, अनुकल्प मिश्रा, …
Read More »माफी मान्य नाही, पत्रकारांना शिविगाळ करणाऱ्या संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा : एस. एम. देशमुख
मुंबई : पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांना अर्वाच्च शिविगाळ करणाऱ्या संजय दिना पाटील यांनी माफी मागितली असली तरी ती आम्हाला मान्य नाही, संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी असून त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचा इशारा एस. एम. देशमुख यांनी दिला आहे.. शिवसेनेच्या ठाकरे …
Read More »आनंदवाडी येथील श्री भाग्यलक्ष्मी कॉ-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड चेअरमनपदी सूर्यकांत शिवणगेकर
बेळगाव : आनंदवाडी शहापूर येथील श्री भाग्यलक्ष्मी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक माजी नगरसेवक व मावळते चेअरमन श्री. मनोहर हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी सूर्यकांत शिवणगेकर यांची चेअरमन पदी व श्रीमती लीला मुचंडी यांची व्हाईस चेअरमन पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी माजी महापौर संचालक किरण सायनाक, माजी …
Read More »काशी जगदगुरु स्वामींच्या मिरवणूकीला अलोट गर्दी
मान्यवरांसह स्वामींची उपस्थिती; दोन दिवस विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : निपाणी येथील विरशैव लिंगायत समाज, पोट जाती व जंगम समाज यांच्यावतीने काशी जगदगुरुंचा उत्सव सोहळ्यानिमित्त वाद्यांच्या गजरात काढलेली मिरवणूक तब्बल दोन तास सुरू होती. त्यामध्ये मान्यवरासह समाजबांधव सहभागी झाले होते. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी ९ वाजता काशी …
Read More »विविधोद्देशीय ग्रामीण कृषी संघातर्फे मृतांच्या वारसांना मदतीचे धनादेश
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाच्या सभागृहात संघाचे दिवंगत सभासद शिवलिंग ऐदमाळे आणि महादेव मडिवाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांना एस.ए.एस. विमा कंपनीतर्फे प्रत्येकी एक लाख रुपये मंजूर झाले होते. त्या विमा धनादेशांचे वितरण कुटुंबीयांना शुक्रवारी (ता.२६) करण्यात आले. संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta