

रमेश जाधव; योजना कमिटीची बैठक
निपाणी (वार्ता) : पंचहमी गॅरंटी योजनेमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. भविष्यात पंचहमी योजना सक्षमपणे राबविण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार प्रयत्नशील असून आता ग्रामपचायत पातळीवर पंचहमी कमिटीची रचना केली जाणार असल्याची माहीती निपाणी तालुका पंचहमी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी दिली. तालुका पंचायत कार्यालयात कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका पंचायत कार्यनिर्वाहक प्रविण कट्टी होते.
जाधव म्हणाले, आतापर्यंत महिलांना गृहलक्ष्मीचे ३१ महिन्याची रक्कम जमा झाली आहे. एकूण ६५६७१ लाभार्थी आहेत. तसेच ४४ मृत लाभार्थीचे ८८ हजार परत केले जातील, तर गृहज्योती योजनेचे निपाणी तालुक्यातील ६८ हजार लाभार्थी आहेत. सध्या गृहज्योती पडताळणीचे काम सुरू असून यामध्ये ६५ टक्के काम पूर्ण झाले असून आहे. अद्यापही ३५ टक्के शिल्लक आहे. तर युवा निधी योजनेतून पदवीधर तर डीप्लोमाधारक लाभार्थ्यांना योग्य रकमेचा लाभ मिळाला आहे. तर अन्नभाग्य योजनचा ६४६७६ कार्डधारक लाभ घेत असून शक्ती योजनेतून महिन्याला निपाणी विभागातून ३० हजारहून अधिक महिला बसने प्रवास करतात. आगारात ९२ बस बस असून आणखी २ नव्या बस दाखल झाल्याचे सांगीतले. यावेळी ता. पं. चे कार्यनिर्वाहक प्रवीण कट्टी यांनी विविध सूचना मांडल्या.
बैठकीस तालुका आहार निरीक्षक अभिजीत गायकवाड, हेस्कॉमचे अभियंता अक्षय चौगुला, नेमिनाथ नेमन्नावर, महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकारी सुप्रीया जडगे, केएससआरसीटीचे चिदानंद लाठी यांच्यासह सदस्य तात्यासाहेब कागले, यासीन मनेर, अशोक लाखे, प्रकाश पाटील, सचिन खोत, वैशाली खोत, गुंडूराव नाईक यांच्यासह कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta