Monday , August 17 2026
Breaking News

बागेवाडी कॉलेजमधील रोट्रॅक्ट क्लबचा उद्या पदग्रहण सोहळा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील रोटरी क्लब संलग्नित बेळगाव केली संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयातील रोट्रॅक्ट क्लब चा शनिवारी (ता.८) सकाळी दहा वाजता पदग्रहण सोहळा होणार आहे. यावेळी जिल्हा रोटरीचे अध्यक्ष रोटेरियन मिलिंद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लबच्या बैठकीत अध्यक्ष चेतन लगारे यांनी दिली.
इव्हेंट अध्यक्ष आशिष कुरबट्टी यांनी, रोटरीच्या माध्यमातून पल्स पोलिओ शैक्षणिक सह विविध सामाजिक कामे केली जात आहेत. त्याला समाजातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. याशिवाय आरोग्य तपासणी शिबीर ही आयोजित केली जात आहेत. रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचे धडे मिळावेत या उद्देशाने हा पदग्रहण सोहळा आयोजित केला आहे. याशिवाय रोटरी क्लब तर्फे लवकरच कानाची तपासणी करून मशीन दिले जाणार आहे. तरी शहर व परिसरातील इच्छुकांनी रोटरी क्लब, चेतन लगारे, सेक्रेटरी राजू सदगीर, खजिनदार चिंतामणी वाळवे, जिल्हा रोटेरियन दिलीप पठाडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे. यावेळी रोटेरियन, प्रमोद जाधव, रमेश पै यांच्यासह रोटर क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *