Monday , August 17 2026
Breaking News

खानापूरात ‘ओअँसिस जननी यात्रा’ : वंध्यत्वग्रस्त दांपत्यांसाठी सुवर्णसंधी

Spread the love

 

खानापूर : वंध्यत्वाबाबत जनजागृती निर्माण करणे, आधुनिक वैद्यकीय उपचारांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि गरजू दांपत्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ओअँसिस IVF अँड फर्टिलिटी यांच्या वतीने “ओअँसिस जननी यात्रा” या मोबाईल फर्टिलिटी क्लिनिकचे आयोजन दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत शिवाजी महाराज स्मारक व कम्युनिटी हॉल, खानापूर येथे करण्यात आले आहे.

या जनजागृती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खानापूरचे लोकप्रिय आमदार मा. श्री. विठ्ठल सोमण्णा हलगेकर उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी लेला शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सदानंद पाटील, खानापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नाडगौडा, उपाध्यक्ष डॉ. मदन कुंभार, तसेच डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि खानापूर तालुक्यातील सर्व डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरात ओअँसिस IVF अँड फर्टिलिटी सेंटरचे अनुभवी व निष्णात वंध्यत्व तज्ज्ञ डॉक्टर प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी, समुपदेशन आणि उपचारासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये मोफत तज्ज्ञ सल्ला, AMH तपासणी, वीर्य तपासणी (Semen Analysis), व्हायरल मार्कर्स तपासणी तसेच आधुनिक वंध्यत्व उपचारांबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच IVF उपचारांवर विशेष सवलतींचाही लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

खानापूर व परिसरातील ज्या दांपत्यांना वंध्यत्वाची समस्या आहे, अशा सर्वांनी या दुर्मीळ व सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा. आधुनिक वैद्यकीय विज्ञानामुळे वंध्यत्वावर प्रभावी उपचार उपलब्ध असून, योग्य वेळी तपासणी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास पालकत्वाचे स्वप्न साकार होऊ शकते.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : शिवाजी महाराज स्मारक व कम्युनिटी हॉल, खानापूर
दिनांक : ७ ऑगस्ट
वेळ : सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.००

– आयोजक : ओअँसिस IVF अँड फर्टिलिटी, खानापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरातील महामेळाव्यातील प्रक्षोभक भाषणाचा खटला निकाली; रामदास कदम, नितीन बानुगडे-पाटील निर्दोष

Spread the love  बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *