Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

“सीमाप्रश्नावर सरकारचे मौन कशासाठी?; ‘राम मंदिराचा प्रश्न सुटतो, मग सीमाप्रश्न का नाही?’ – विधिमंडळात भाई जगतापांचा सरकारला घेराव

  मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा केवळ सीमाभागातील नागरिकांचा प्रश्न नसून तो संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि मराठी अस्मितेचा विषय आहे. तरीही सहा दशकांहून अधिक काळ हा प्रश्न प्रलंबितच असून, सरकारकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप करत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी महाराष्ट्र विधिमंडळात सरकारला धारेवर धरले. “मराठी भाषेला अभिजात …

Read More »

मराठा बँकेच्यावतीने शनिवारी सभासदांच्या मुलांचा गौरव सोहळा

  बेळगाव : मराठा को-ऑप. बँकेच्यावतीने दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत विशेष गुणवत्ता घेऊन उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या गुणवंत मुलांचा गौरव समारंभ शनिवार दि. ४ जुलै रोजी दु. ३ वा. मराठा बँकेच्या छ. शिवाजी महाराज सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सागर अनुसये (सायबर सेक्युरिटी सल्लागार, इचलकरंजी) …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा रोटरी वर्ष २०२६–२७ साठीचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या समारंभातून सेवा, मैत्री आणि समाजहिताच्या कार्याला नव्या उत्साहाने प्रारंभ झाला. शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी झालेल्या या समारंभात रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी अध्यक्षपदाची, रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांनी सचिवपदाची आणि रोटेरियन …

Read More »

व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या शंभर टक्के निकालाबद्दल एसडीएमसीकडून शिक्षकांचा सत्कार

  मच्छे : येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील विद्यमान व माजी एसडीएमसी सदस्यांनी आपल्या गावातील व्ही. एस. पाटील हायस्कूल, मच्छे यांना यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल सदिच्छा भेट देऊन शिक्षकवृंदांचे अभिनंदन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात शाळेच्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात …

Read More »

मराठी अर्ज नसल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांना धाडले माघारी

  बेळगाव : बेळगावसह सीमाभागात सध्या निवडणूक विभागाकडून मतदार यादी फेरनिरीक्षण (SIR – Special Intensive Revision) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांना अर्ज दिले जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून हे अर्ज केवळ ‘कन्नड’ भाषेतच उपलब्ध करून दिले जात असल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाषिक अधिकारांची …

Read More »

मतदार यादीत नाव नसल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

  राज्यातील मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेला चालना बंगळूर : राज्यातील विशेष मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी आपल्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी गणना अर्ज भरून प्रारंभ केला. यावेळी त्यांनी, मतदार यादीत नाव नसलेल्या व्यक्तींना हमी योजनांसह इतर शासकीय सुविधांचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री …

Read More »

खानापूरमध्ये पाच दिवस पाणीपुरवठा बंद; टाक्यांची स्वच्छता व दुरुस्तीची कामे

  खानापूर : खानापूर नगरपंचायतीमार्फत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठा टाक्यांची स्वच्छता तसेच आवश्यक किरकोळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवार, दि. 2 जुलै ते सोमवार, दि. 6 जुलै 2026 या कालावधीत शहरातील नियमित पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी दिली. या कालावधीत नागरिकांनी पिण्यासाठी …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्तरावरील स्पेल बी परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथील इयत्ता पाचवी ‘ब’ मधील विद्यार्थिनी अन्शाराह शोएब मुल्ला हिने आपल्या उत्कृष्ट शब्दलेखन कौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व व मेहनतीच्या जोरावर WIZ International Spell Bee या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. …

Read More »

अनगोळनंतर काँग्रेस रोडवरील अतिक्रमणांवरही बुलडोझर; रात्री उशिरापर्यंत मोहीम

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने अनगोळ परिसरानंतर काँग्रेस रोड आणि परिसरातील अवैध अतिक्रमणांवरही मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई करत रस्ते व पदपथ मोकळे केले. पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडलेल्या या मोहिमेत स्टॉल, पत्र्याचे शेड तसेच काही अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. महानगरपालिकेने यापूर्वी अनगोळ नाका ते मराठी शाळा या …

Read More »

एमपीएससीची २६१९ पदांसाठी मेगाभरती; सीमाभागातील ८६५ गावांतील युवकांसाठी मोठी संधी

  बेळगाव : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सीमाभागातील हजारो युवक-युवतींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क संवर्गातील तब्बल २६१९ रिक्त पदांच्या मेगाभरतीची अधिसूचना जाहीर केली असून, महाराष्ट्राने दावा केलेल्या बेळगाव परिसरातील ८६५ मराठी भाषिक गावांतील पात्र उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ‘महाराष्ट्र गट-क सेवा …

Read More »