Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

मराठीत जनगणना फॉर्म उपलब्ध करा; तोपर्यंत विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया स्थगित करा

  महाराष्ट्र एकीकरण समितीचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील खानापूर विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील गणना फॉर्म तातडीने उपलब्ध करून द्यावेत. तसेच मराठीतील फॉर्म उपलब्ध होईपर्यंत ही प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती, खानापूर तालुक्याच्या वतीने …

Read More »

सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक पुढील आठवड्यात?; महाराष्ट्र सरकारच्या हालचालींना वेग

    बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारकडून हालचालींना वेग आला असून सामान्य प्रशासन विभागाकडून बैठकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. उच्चाधिकार समितीची बैठक मंगळवार, ३० जून रोजी होणार होती. या बैठकीस …

Read More »

जुलैत मान्सूनचा दमदार कमबॅक; बेळगावसह उत्तर कर्नाटकात ७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

  बेळगाव : जून महिनाभर मान्सूनने राज्याला अक्षरशः हुलकावणी दिल्याने पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले. धरणांतील जलसाठा घटला, शेतीची कामे खोळंबली आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मात्र आता जुलैच्या प्रारंभी हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजामुळे दिलासादायक चित्र समोर आले असून बेळगाव, धारवाड आणि हावेरी जिल्ह्यांसह उत्तर …

Read More »

बेळगावकर सरांच्या कार्याचा गौरव; सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळेत सत्कार समारंभ

  मच्छे : येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील सहशिक्षक तसेच गेली अडीच वर्षे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळलेले मा. श्री. बेळगावकर सर यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी वाघवडे येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू होत आपल्या शाळेचा निरोप घेतला. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शाळेत नुकताच …

Read More »

निपाणीत बेंदूर सणानिमित्त कर तोडणी कार्यक्रमाला मानकऱ्यासह नागरिकांची गर्दी

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजी राजे निपाणकर राजवाड्यामध्ये शेकडो वर्षापासून बेंदूर सणानिमित्त कर तोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. यंदाही येथील गांधी श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर- सरकार, विजयराजे देसाई- सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील गांधी चौकात मानाच्या बैल जोड्याद्वारे कर तोडणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मानकऱ्यासह नागरिकांची गर्दी झाली …

Read More »

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘डॉक्टर्स डे’ दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्राबाबत मार्गदर्शन

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे तर प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी डॉ.अल्फिया उस्ताद नदाफ उपस्थित होत्या. समर्थ आयरेकर याने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे …

Read More »

राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने प्रा. विठ्ठल नाईक सन्मानित

  निपाणी (वार्ता) : पत्रकारिता क्षेत्रातील कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशन आणि नागरिक सेवा संस्थेतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. विठ्ठल नाईक यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषद विरोधी गटनेते आम. …

Read More »

डॉक्टर्स डे निमित्त डॉ. राजश्री अनगोळ यांचा जायंट्स सखीतर्फे सन्मान

  बेळगाव : राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या वतीने बालरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री अनगोळ यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. बी. के. मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी डॉक्टरांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त …

Read More »

सीसीबीची कारवाई : ९ लाखांच्या हेरॉईनसह एकाला अटक

  बेळगाव : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात सीसीबी (CCB) पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ९ लाख रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. ३० जून २०२६ रोजी सिसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक मंजनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंजनाथ भजन्त्री व त्यांच्या पथकाने बेळगाव केएसआरटीसीच्या …

Read More »

‘नळातून पाणी नव्हे, विषच!’ चव्हाट गल्लीतील नागरिकांचा संताप; तोडगा न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

  बेळगाव : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, पंधरा-पंधरा दिवसांनी होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि त्यातही नळातून येणारे दूषित पाणी यामुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. चव्हाट गल्ली परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यात थेट गटार आणि ड्रेनेजचे पाणी मिसळून येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरशः …

Read More »