Monday , September 7 2026
Breaking News

के. एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक धुळा सावंत यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव शिक्षण संघ संचालित के. एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक धुळा सावंत यांनी प्रदीर्घ व यशस्वी शिक्षक सेवेनंत सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
के.एस पाटील हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी, स्पर्धात्मक परिस्थितीत शिक्षण संस्था चालवणे आव्हान असतानाही मुख्याध्यापक ए. ए. धूळा सावंत यांनी शिस्तबद्ध, नेटक्या नियोजनाने शाळेच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. संस्था कमिटी शिक्षक व विद्यार्थ्यांना आपलेसे करून गुणात्मक शिक्षणावर भर देण्यास अधिक प्रयत्न केले आहेत. त्यांचा कार्यकाळ आणि त्यांचे शिक्षण पद्धती संस्थेसाठी भविष्यातही कायम प्रेरणादायी ठरेल असा आशावाद व्यक्त केला. एस. टी लगारे यांनीही सावंत यांच्या कार्याचा आढावा घेतला. सावंत यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील, डॉ. संजय पाटील, महावीर रोड, महादेव नेजे, बापूसाहेब रुगे, शिवानंद राजमाने, प्रभारी मुख्याध्यापक के. बी. पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदिनाथ हवले यांच्यासह शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शालेय स्पर्धा सकारात्मक दृष्टिकोन वाढविणारे प्रभावी माध्यम; दशरथ कुंभार

Spread the love  कुर्लीत कथालेखन स्पर्धा निपाणी (वार्ता) : शालेय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना जिंकणे, हरणे यापेक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *