Sunday , August 16 2026
Breaking News

जुन्या पीबी रोडवरील दुभाजकांमध्ये वृक्षारोपणाला नागरिकांचा प्रतिसाद

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : क्रांती दिनानिमित्त नगरपालिका ते बस स्थानक पर्यंतच्या दुभाजकमध्ये ७५ शोभेचे झाडे लावण्यात आली. मराठा बँकचे संचालक बाबासाहेब तिप्पे यांनी स्वखर्चाने ही झाडे लावली आहे.
ही मोहीम राबविण्यासाठी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, आरोग्य विभाग अधिकारी अभियंते विनायक जाधव यांच्यासह सफाई कर्मचारी यांनी सहकार्य लाभले. याशिवाय बाळासाहेब कमते यांनीही स्वखर्चाने रोपे आणून लावली आहेत. त्यामुळे दुभाजकामधील वृक्षारोपणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लावत आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत, उत्तम कामते, माजी नगरसेवक ॲड. संजय चव्हाण, अशोक लाखे समीर काझी, अश्रफ मुल्ला, जुबेर पकाली, चंद्रकांत चव्हाण, फरीदा बुखारी, मंगल घोरपडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

स्तवनिधीत स्वातंत्र्यदिन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित बाल विकास मंदिर, पी. जी. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *