






निपाणी (वार्ता) : आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्यात आला आहे. कोणत्याही प्रसंगाला पुढे येऊन त्यांच्या कामाला बळ देण्याचा निर्धार करण्यात आल्याचे प्रा सुरेश कांबळे यांनी सांगितले. येथील डॉ. आंबेडकर विचारमंचतर्फे आयोजित कार्यकर्ता मानसन्मान मेळाव्यात ते बोलत होते.

प्रा. कांबळे म्हणाले, जीवनात कार्यकर्ता हा केवळ कार्यकर्ता बनून न राहता त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी समस्या दूर केल्या तर तो समाज मनाला जागृत करण्यासाठी सक्षम होईल. अन्यथा एखाद्या कार्यकर्त्याची पिळवणूक अथवा त्याच्यावरती अन्याय अत्याचार झाल्यास तो कोणत्याही प्रकारचे काम करणार नसल्याची भावना निर्माण होऊन समाज अस्वस्थ होईल. त्यामुळेच डॉ. आंबेडकर विचार मंचने बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख दलित नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मानसन्मान मेळावा आयोजित केल्याचे सांगितले.
यावेळी मल्लेश चौगुले यांना कर्नाटक राज्य युवा काँग्रेसचे संचालक पद मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अजय माने, विजय कांबळे, रमेश कांबळे, योगेश दाभाडे, प्रमोद कांबळे, अनिल मसाळे, लक्ष्मण माने, रतन पोळ, सुधाकर ऐवाळे, अमित शिंदे, संदीप कांबळे, विवेक कांबळे यांनी कार्यकर्त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी मांडल्या.
मेळाव्यास सुरेश तळवार, सतीश माळगे अशोककुमार असोदे, राजेंद्र वडर-पवार, विलास गाडीवड्डर, डॉ. अच्युत माने, ॲड. अविनाश कट्टी, प्रा. डॉ. एन. डी. जत्राटकर, प्रा. जे. डी. कांबळे, अशोक लाखे, भारत रोडे, किसन दावणे, रवी श्रीखंडे, विजय मेत्राणी, अमित शिंदे, संदीप माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
दीपक शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप माने यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta