बेळगाव : मराठा मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी. फार्मसी प्रथम वर्षाच्या मार्च २०२६ वार्षिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, महाविद्यालयाने ९४ टक्के निकालाची उल्लेखनीय नोंद केली आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. परीक्षेत कु. वैष्णवी हेमंत निकम हिने ७३२ गुण …
Read More »बेळगाव–दिल्ली विमानसेवेत मोठी कपात; दैनंदिन उड्डाणे बंद, आठवड्यातून केवळ तीन फेऱ्या
बेळगाव : बेळगावच्या हवाई संपर्काला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाही बेळगाव–दिल्ली दैनंदिन विमानसेवा बंद करून ती आठवड्यातून केवळ तीन दिवसांपुरती मर्यादित करण्यात आली आहे. १ जुलैपासून हा बदल लागू झाला असून ऑक्टोबरपर्यंत हेच वेळापत्रक कायम राहणार आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी, नोकरदार …
Read More »अरिहंत संस्थेने उंचावले सर्वसामान्यांचे जीवन
सहकाररत्न उत्तम पाटील; निपाणी शाखेचा २३ वा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यवसायिक, उद्योजकांना केंद्रबिंदू म्हणून बोरगाव येथे दिवंगत रावसाहेब पाटील यांनी अरिहंत को-ऑप संस्थेची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून पत पुरवठा करून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. सध्या संस्थेच्या कर्नाटक आणि महाराष्ट्रात विविध शाखाद्वारे कार्य सुरू आहे. …
Read More »बसच्या खिडकीतून थुंकण्यासाठी डोके बाहेर काढणे जीवावर बेतले; लॉरीची धडक लागून आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू
हुबळी : धावत्या बसच्या खिडकीतून थुंकण्यासाठी डोके बाहेर काढलेल्या १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा बाजूने जाणाऱ्या लॉरीला धडक लागून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धारवाड जिल्ह्यातील कुंदगोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी घडली. मृत विद्यार्थ्याची ओळख फक्कीरेश चन्नय्या मुत्तळीमठ (वय १७, रा. शिरूर) अशी झाली असून, तो आयटीआयचे शिक्षण घेत …
Read More »स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांचीच; कर्नाटक उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश
बेंगळुरू : शाळेत विद्यार्थी ज्या प्रकारे सुरक्षित असतो, त्याचप्रमाणे घर ते शाळा आणि शाळा ते घर या प्रवासादरम्यानही त्याची सुरक्षा सुनिश्चित करणे ही शाळेचीच कायदेशीर जबाबदारी आहे. स्कूल बस ही शाळेच्या शैक्षणिक व्यवस्थेचाच अविभाज्य भाग असून या जबाबदारीतून कोणतीही शाळा स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण …
Read More »व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल १८३.५० रुपयांनी स्वस्त; तेल कंपन्यांचा मोठा दिलासा
नवी दिल्ली : महागाईच्या झळा सहन करणाऱ्या व्यावसायिक ग्राहकांना सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल १८३.५० रुपयांची कपात जाहीर केली आहे. नव्या दरानुसार दिल्लीत या सिलेंडरची किंमत १,९३० रुपये इतकी झाली आहे. याचबरोबर ५ किलो वजनाच्या …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि रोटरी बेळगाव परिवारातर्फे जिल्हास्तरीय रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
बेळगाव : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० च्या “Create Lasting Impact” या संकल्पनेअंतर्गत, रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि रोटरी बेळगाव परिवाराने बुधवार, १ जुलै २०२६ रोजी एसजीबीआयटी, शिवबसव नगर, बेळगाव येथे जिल्हास्तरीय रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले. या रक्तदान शिबिराला रोटेरियन, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक …
Read More »आरोग्य भारती बेळगाव व खानापूर शाखेतर्फे राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त ज्येष्ठ वैद्यकीय सेवकांचा गौरव
खानापूर : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आज आरोग्य भारती बेळगाव व खानापूर शाखेतर्फे खानापूर, हलशी, बीडी व परिसरात १९८०–९० च्या दशकातील दुर्गम भागात वैद्यकीय सेवा उपलब्ध नसलेल्या काळात एम.बी.बी.एस. पदवी संपादन करून आपल्या मातृभूमीत गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ निःस्वार्थ भावनेने वैद्यकीय सेवा करणारे वैद्यकीय त्रिरत्न डॉ. सुधीर नाईक, डॉ. …
Read More »व्हीटीयूचा देशात नवा विक्रम; परीक्षा संपल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत निकाल जाहीर
बेळगाव : विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाने (व्हीटीयू) निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेत देशात नवा आदर्श निर्माण करत अभियांत्रिकीच्या सहाव्या सेमिस्टरचा निकाल परीक्षा संपल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत जाहीर केला आहे. या अभूतपूर्व कामगिरीमुळे ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागली नाही. निकाल जाहीर करण्याच्या वेगाबाबत व्हीटीयूने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत इतिहास …
Read More »मतदार यादी विशेष पुनरिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्या : रमाकांत कोंडुसकर यांचे आवाहन
बेळगाव : बेळगाव आणि परिसरातील नागरिकांनी सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR – Special Intensive Revision) प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तथा श्रीराम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक विभागाच्या माध्यमातून सध्या मतदार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta