Sunday , August 16 2026
Breaking News

टँकरची ऑटो रिक्षाला धडक; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

शेतीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; ७ हून अधिक जण जखमी

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जहीराबादजवळ चिरागपल्ली-सत्वार राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ऑटोचालकासह सहा जणांचा मृत्यू झाला. शेतीचे काम आटोपून ऑटो रिक्षातून आपल्या गावाकडे परतणाऱ्या मजुरांच्या ऑटोला भरधाव टँकरने जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता एवढी होती की ऑटो रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात ऑटोचालकासह पाच शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मृत सर्वजण बीदर जिल्ह्यातील राजगिरी गावचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. अपघातात सातहून अधिक जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जहीराबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताच्या कारणांचा तसेच टँकर चालकाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री विजय यांना मद्रास उच्च न्यायालयाचा झटका; करुर चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीचा निर्णय रद्द

Spread the love  चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सरकारला मद्रास उच्च न्यायालयाने मोठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *