Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

शाहूनगरमधील समस्या न सोडवल्यास आंदोलनाचा इशारा

  पाणीटंचाई, पथदिप, अस्वच्छतेबाबत बाबत नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी उपनगरातील शाहूनगर व आश्रयनगर परिसरात पाणीटंचाई, बंद पथदिप आणि अस्वच्छतेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्या त्वरित सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत नागरिकांनी देऊन आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन देण्यात …

Read More »

उद्या मराठी भाषिक प्रतिनिधी घेणार बेळगाव महानगरपालिका आयुक्तांची भेट

  बेळगाव : बेळगाव शहरात मतदार फेर निरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेचे अर्ज फक्त कन्नड भाषेत उपलब्ध करण्यात आले असून, बेळगावमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक असल्याने सदर अर्ज मराठीत उपलब्ध करून द्यावेत यासाठी महानगर पालिका आयुक्त तथा शहर निवडणूक अधिकारी यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र …

Read More »

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक ८ जुलैला; सीमावासीयांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या लढ्याला दिशा देणारी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अपेक्षांचे केंद्रबिंदू ठरलेली उच्चाधिकार समितीची बैठक आता बुधवार दि. ८ जुलै रोजी मुंबईतील मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ सभागृहात होणार आहे. यापूर्वी ही बैठक ३० जून रोजी विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव ती रद्द करण्यात …

Read More »

बोरगाव येथील अरिहंत सभागृहात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

  निपाणी (वार्ता) : केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला ५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ‘सहकार सप्ताह’‌साजरा करण्यात येणार आहे. सहकार विभाग, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बेळगांव, विविदोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ बोरगांव, श्री अरिहंत को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि; बोरगांव (मल्टी-स्टेट) अरिहंत हॉस्पिटल, बेळगांव, लट्ठे शैक्षणिक संस्था, आचार्य देशभूषण आयुर्वेदिक …

Read More »

संत मीरा, भातकांडे, शांतिनिकेतन शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश

  बेळगाव : टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत संत मीरा इंग्रजी शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत उदघाटनच्या दिवशी संत मीरा अनगोळ, गजाननराव भातकांडे स्कूल, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी …

Read More »

गोवा (अनमोड) महामार्गावरील वरकडा गावाजवळ चिखलात बस अडकली; स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा

  खानापूर : बेळगाव – गोवा (अनमोड) महामार्गावरील वरकडा (ता. खानापूर) गावाजवळ गुरुवारी सकाळी एनडब्ल्यूकेआरटीसीची बस चिखलात अडकल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, तर महामार्गावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मुसळधार पावसामुळे वरकडा परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून रस्त्याची दयनीय …

Read More »

वाघवडे हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित वाघवडे हायस्कूल येथे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. के. पाटील होते. शाळेचे मुख्याध्यापक भारत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर …

Read More »

सखी ग्रुपचा वटपौर्णिमा महिला मेळावा उत्साहात; विविध स्पर्धांनी रंगली सांस्कृतिक पर्वणी

बेळगाव : महिलांमध्ये सांस्कृतिक परंपरांचे जतन, परस्पर स्नेह वृद्धिंगत करणे आणि कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सखी ग्रुपच्या वतीने दि. 26 जून रोजी खडेबाजार येथील श्री नामदेव देवकी संस्थेत आयोजित करण्यात आलेला वटपौर्णिमा विशेष महिला मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सुमारे 80 महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह …

Read More »

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीत भाजीपाला व फळ कोरीवकला स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगावच्या सांस्कृतिक समितीच्या वतीने “निसर्ग आणि वन्यजीव” या विषयावर आयोजित करण्यात आलेली भाजीपाला व फळ कोरीवकला स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत डी.फार्म., बी.फार्म. आणि एम.फार्म. विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रकारच्या भाजीपाला व फळांपासून आकर्षक व कल्पक कलाकृती …

Read More »

बंगळूरच्या दगड खाणीत भीषण दुर्घटना; दरड कोसळून ९ मजुरांचा मृत्यू

  बंगळूर : कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे गुरुवारी पहाटे दगड खाणीत भीषण दुर्घटना घडली. बंगळूर दक्षिण तालुक्यातील मदापटना परिसरातील एका दगड खाणीत अचानक दरड कोसळल्याने ९ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. …

Read More »