
सावंतवाडी : सावंतवाडी येथील सुपुत्र विक्रम नाईक यांना नुकताच गणित विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. पिलानी राजस्थान, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून संपादन केल्याबद्दल ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे त्यांचा विशेष सन्मान समारंभ आरपीडी हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
अध्यक्षस्थानी सावंतवाडी पतपेढी चेअरमन रमेश बोंद्रे उपस्थित होते.
दरवर्षी ज्ञानदीपतर्फे गुणवंतांचा सत्कार करण्यात येतो. एक कौतुकाची थाप मिळावी, भविष्यात प्रोत्साहन देण्यासाठी, काम करण्याची उमेद मिळते या उद्देशाने हा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
प्रारंभी संस्थापक वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक करुन मंडळ राबवित असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
या निमित्ताने गुरू वंदन कार्यक्रम आनंदात साजरा केला
डॉ विक्रम चे दहावी पर्यंतचे शिक्षण, मिलाग्रीज हायस्कूल, बारावी विज्ञान, आर पी डी ज्युनिअर कॉलेज, बी एससी संत राऊळ महाविद्यालय कुडाळ, एम एससी मुंबई विद्यापीठात तसेच, सेट, नेट, गेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पिलानी राजस्थान येथून नुकताच गणित विषयात पीएचडी संपादन केली.
त्याच्या या यशाबद्दल विविध संस्थांतर्फे मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
मिलाग्रीज हायस्कूलतर्फे जी आर कालकुंद्रीकर, आर पी डी तर्फे, प्रा बी आर नंदिहळ्ळी, प्रा.अजय कामत, प्रा.संतोष पाथरवट, संत राऊळ महाविद्यालयतर्फे प्रा अरुण पणदूरकर, सावंतवाडी पतपेढी तर्फे उमाकांत वारंग,कळसुलकर हायस्कूलतर्फे प्रदीप सावंत, सिद्धेश कुळकर्णी, पी.बी बागुल, तसेच विलास कासकर, अनिल कांबळे, सुरेश काळे, ओटवणेचे कांबळे, धोगडे, भरत गावडे, विठ्ठल कदम, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, विनायक गावस, सुनील नेवगी, संजय बांबुळकर, निवृत्त मुख्याध्यापक एस आर मांगले आदी मान्यवरांनी सन्मान केला.
यावेळी वाय पी नाईक यांची अखिल भारतीय नाईक रामोशी बेरड समाज विकास परिषद पुणे, उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला
व्यासपीठावर रमेश बोंद्रे, गणपती कालकुंद्रीकर, उमाकांत वारंग, जावेद शेख, डॉ विक्रम नाईक, प्रदीप सावंत, प्रा अरुण पणदूरकर, प्रा बी आर नंदिहळ्ळी, निलेश पारकर, भरत गावडे, विठ्ठल कदम,एसआर मांगले, सुनील नेवगी, विलास कासकर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गणपती कालकुंद्रीकर उमाकांत वारंग, बाळासाहेब नंदिहळ्ळी, अरुण पणदूरकर, संतोष पाथरवट, अजय कामत, यांनी विक्रमच्या या यशाबद्दल, त्याची चिकाटी, जिद्द, मृदू स्वभाव,शांत संयमी, अभ्यासाचे नियोजन, प्रयत्न महत्त्वाचे आहेत.
क्रिकेट खेळातही त्यांनं नैपुण्य प्राप्त केले आहे, असे गौरवोद्गार काढले.
डॉ विक्रम नाईक यांनीही मनोगत व्यक्त करताना शिक्षक, आईवडील, मित्रपरिवार या यशामागे शुभेच्छा आहेत आशीर्वाद महत्त्वाचा असतो हे आवर्जून उल्लेख केला.
यावेळी शिक्षक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉ. विक्रम हे वाय पी नाईक यांचे सुपुत्र होत.
सूत्रसंचालन वैभव केंकरे, आभार निलेश पारकर यांनी मानले.

Belgaum Varta Belgaum Varta