
बंगळुरू : कर्नाटकातील मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील २३ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. राज्यपाल कार्यालयाने बुधवारी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, खातेवाटप तात्काळ लागू करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी अर्थ खाते, मंत्रिमंडळ व्यवहार, कर्मचारी व प्रशासकीय सुधारणा, गुप्तचर, माहिती, कायदा, न्याय व मानवाधिकार, संसदीय कामकाज व विधिमंडळ, कृषी बाजारपेठ, नगर व शहर नियोजन आयुक्तालय, बीडीए, बीएमआरडीएअंतर्गत सर्व नागरी स्थानिक संस्था तसेच वाटप न झालेली खाती स्वतःकडे ठेवली आहेत.
मंत्र्यांना मिळालेली खाती
बी. झेड. जमीर अहमद खान — गृहनिर्माण
रामलिंगा रेड्डी — वन, पर्यावरण व पर्यावरण विज्ञान
लक्ष्मण सवदी — कृषी बाजारपेठ वगळता सहकार
रुद्रप्पा मनप्पा लमाणी — साखर व वस्त्रोद्योग
के. एच. मुनियप्पा — समाजकल्याण
शिवराज तंगडगी — मागासवर्गीय कल्याण, कन्नड व संस्कृती
यू. टी. खादर — अल्पसंख्याक कल्याण, हज व वक्फ, आरोग्य व कुटुंब कल्याण
टी. रघुमूर्ती — अनुसूचित जमाती कल्याण
डॉ. अजय सिंह — लघु पाटबंधारे, विज्ञान व तंत्रज्ञान
चेलुवरायस्वामी — मोठे व मध्यम पाटबंधारे
मधु बंगारप्पा — प्राथमिक व माध्यमिक शिक्षण
बसवराज रायरेड्डी — उच्च शिक्षण
शिवलिंगेगौडा — अबकारी
पुट्टरंग शेट्टी — पशुसंवर्धन व रेशीम
विजयानंद काशप्पनवर — लघुउद्योग, सार्वजनिक उपक्रम
संतोष लाड — कामगार व रोजगार
के. एस. बसवंतप्पा — मुजराई, मत्स्यव्यवसाय, बंदरे व अंतर्गत जलवाहतूक
एस. एस. मल्लिकार्जुन — खाण व भूविज्ञान, फलोत्पादन
रिझवान अर्शद — अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार
नरेंद्र स्वामी — कृषी
एच. सी. बालकृष्ण — नगर प्रशासन
बी. नागेंद्र — नियोजन व सांख्यिकी
नव्या खातेवाटपामुळे शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार, साखर, सिंचन, समाजकल्याण आणि नगर प्रशासनासह विविध महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी मंत्र्यांमध्ये निश्चित झाली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta