Sunday , August 16 2026
Breaking News

बोरगाव सर्कल कामाबाबत राजेंद्र पवार यांनी घेतली मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरण कामाला विलंब होत असल्याने प्रवाशासह वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर- पवार यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन माहिती दिली.
मंत्री जारकीहोळी यांच्या अलदाळ येथील गेस्ट हाऊस मध्ये ही भेट घेतली. गेली आठ महिने बोरगाव सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरण कामास विलंब होत आहे. सर्कल परिसरात असलेले अतिक्रमण काढण्यासाठी अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. अतिक्रमण काढणे हे शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. पण त्यांच्या दुर्लक्षामुळे सर्कल रुंदीकरण कामास विलंब होत आहे. रुंदीकरण होऊन सुशोभीकरण झाल्यास बोरगाव शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. कर्नाटक महाराष्ट्राचे प्रमुख प्रवेशद्वार असलेले बोरगाव सर्कल मोठे होऊन सुशोभीकरण होणे ही काळाची गरज आहे. यासाठी सरकारकडून अडीच कोटींची निधीही मंजूर झाला आहे. मजबूत रस्ता काम व्हावे अशी गेल्या अनेक वर्षापासून ची मागणी आहे. यासाठी आपण विशेष लक्ष घालून काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी यावेळी पवार यांनी केली.
पवार यांच्या मागणीची दखल घेत मंत्री सतीश जारकीहोळी यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ काम पूर्ण करावे. याशिवाय अतिक्रमण काढण्याबाबत कोणतेच भेदभाव न करता, अतिक्रमणधारकांना पुन्हा एकदा नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यास सांगावे व सुशोभीकरण कार्य लवकरात पूर्ण करून प्रवासी व नागरिकांना सोय करून द्यावी अशी सूचना केली.

About Belgaum Varta

Check Also

स्तवनिधीत स्वातंत्र्यदिन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित बाल विकास मंदिर, पी. जी. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *