बेळगाव : एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्याचा जीव वाचवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न म्हणजे प्रथमोपचार होय. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला प्रथमोपचार आणि सीपीआर (हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन) याची मूलभूत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंडियन रेड क्रॉस सोसायटी (IRCS)च्या खजिनदार लेफ्टनंट कर्नल विनोदिनी शर्मा यांनी …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा सेवाभावी उपक्रम; श्रवण तपासणी व हिअरिंग एड वितरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : समाजातील श्रवणदोष असलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऑडिओमेट्री श्रवण तपासणी व हिअरिंग एड वितरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन ऍड. विजयलक्ष्मी मन्निकेरी आणि सचिव रोटेरियन …
Read More »माध्यमिक शाळांतील सहशिक्षकांना व्याख्याता पदोन्नती प्रक्रियेला वेग; कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश
बेळगाव : सरकारी माध्यमिक शाळांतील सहशिक्षकांना सरकारी पदवी पूर्व महाविद्यालयातील व्याख्याता पदावर पदोन्नती देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी घेण्यात आलेल्या पात्रता परिषदेत 50 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रे ४ जुलैपर्यंत तीन प्रतींमध्ये सादर करावीत, असे निर्देश जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. शालेय …
Read More »हुणसीकोळ मठाच्या श्रींवर हल्ल्याचा प्रयत्न; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील यमकनमरडी येथील हुणसीकोळ मठाचे श्री शिद्धबसव स्वामीजी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मठालगत राहणाऱ्या मेदार कुटुंबीयांनी स्वामीजींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आनंद मेदार, रत्ना मेदार, मंजुनाथ, प्रवीण मेदार यांच्यासह …
Read More »वारा-पावसामुळे कोसळलेल्या झाडांची महापालिकेकडून तातडीने दखल; वाहतूक पूर्ववत
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बेळगाव शहरातील विविध भागांत अनेक झाडे रस्त्यावर कोसळली. शुक्रवारी कुमारस्वामी लेआऊटसह शहरातील अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. …
Read More »चोर्ला मार्गावरील बससेवेच्या निवेदनाची दखल; दहा दिवसांत नवीन बस सुरू करण्याचे आश्वासन
गुंजी येथे बस थांब्यासाठी निवेदन खानापूर : बेळगाव बसस्थानक ते चोर्ला नवीन बससेवा सुरू करावी तसेच या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय दूर करावी, या मागणीसाठी सरकारी हमी योजना अंमलबजावणी समिती, खानापूर तालुक्याचे अध्यक्ष सूर्यकांत के. कुलकर्णी यांनी एनडब्ल्यूकेएसआरटीसीच्या बेळगाव विभागीय नियंत्रकांना निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल हमी योजनेच्या …
Read More »घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ६१९ घरांचे हस्तांतरण करा, अन्यथा आंदोलनाची तयारी : विलास गाडीवड्डर
निपाणी (वार्ता) : सत्ता आणि हाती मंत्रिपद असूनही आमदार शशिकला जोल्ले यांना सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. त्यांना केवळ खोटे अश्रू दाखवून गरीबांचा राजकारण आणि त्यांच्या मतांसाठी वापर करावयाचा असल्याचे दिसून येत आहे. त्यांना खरोखरोखरच आपल्या नव्हे, तर गरीबांच्या स्वप्नाची काळजी असेल तर त्यांनी त्यांच्या अट्टाहासाप्रमाणे ६०० …
Read More »आरोग्य सेवेबाबत सहकाराची भूमिका महत्त्वाची
सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगाव येथे आरोग्य तपासणी शिबिरास उत्सपूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. सहकाराच्या माध्यमातून आरोग्य सेवेला अधिक बळकटी देता येईल, असे मत सहकार रत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या …
Read More »विद्या भारती फुटबॉल स्पर्धत संत मीरा अनगोळ विजेतेपद
बेळगाव : टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत संत मीरा इंग्रजी शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा अनगोळ शाळेने चारी गटाचे विजेतेपद पटकावित चौकार मारला. आता या सघाची राज्य फुटबॉल स्पधसाठी निवड झाली आहे. प्राथमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने …
Read More »न्यू गुड्स शेड रस्त्याच्या तात्काळ कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी; महापालिका आयुक्तांना निवेदन
बेळगाव : डेक्कन हॉस्पिटलसमोरील, बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील न्यू गुड्स शेड रस्त्याची तात्काळ कायमस्वरूपी दुरुस्ती करून दोन्ही बाजूंना जलनिस्सारण गटारी उभाराव्यात, अशी मागणी समाजसेवक गणेश दड्डीकर यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यापूर्वी १० जून २०२६ रोजीही याच मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर संबंधित विभागाच्या सेक्शन ऑफिसर यांनी जागेची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta