Friday , October 23 2026
Breaking News

शॉपिंग उत्सवाचा शानदार प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : “गेल्या वीस वर्षे होऊन अधिक काळ सातत्याने नवनवीन उत्पादने बेळगावकरांना उपलब्ध करून देणे हे कौशल्याचे काम आहे हे काम यश कम्युनिकेशन्स करीत आहे बेळगावकरांनी भेट देऊन प्रदर्शनातील वस्तूंची पाहणी करावी आणि प्रोत्साहन द्यावे” असे आवाहन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज चे उपाध्यक्ष राजेंद्र मुतगेकर यांनी शुक्रवारी सायंकाळी केले. 14 ते 18 ऑगस्ट असे सलग पाच दिवस मिलेनियम गार्डन येथे चालणाऱ्या शॉपिंग उत्सवाचा शुभारंभ मुतगेकर यांच्या हस्ते झाला.
याप्रसंगी यश चे आयोजक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की उत्पादक आणि ग्राहक यांचा संपर्क वाढविणे उत्पादकांना ग्राहकपेठ मिळवून देणे या उद्देशाने गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही कार्यरत असून आज देशात आकर्षण असलेल्या इलेक्ट्रिक कारचे आणि दुचाकींचे या माध्यमातून प्रदर्शन मानण्यात आले आहे ज्यामध्ये बजाज चेतक, अँप्री, एमजी कार, अथर, बीगाॅस, सुझुकी आदी कंपन्यांनी सहभाग घेतला आहे त्याचबरोबर कंजूमर, ज्वेलरी फर्निचर गारमेंट्स इन्शुरन्स टुरिझम फायनान्स या भागांचा समावेश आहे टुरिझम मध्ये गगन टूर्स व प्रवीण हॉलिडेज यांचा समावेश आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही बेळगाव व बेळगावच्या बाहेरही अनेक एक्स्पोनचे आयोजन केले आहे असे ते म्हणाले याप्रसंगी पाहुणे म्हणून शिवसंत संजय मोरे, मनपाचे माजी अधिकारी डी के निंबाळ, बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेचे सुधाकर चाळके, टाटा इन्शुरन्सचे दत्तात्रय जाधव, सचिन सांबरेकर याचबरोबर निखिल सोमनाचे, विक्रम चौगुले, सविता वेसणे, सविता हेब्बार, मराठा व्यवसाय संघाचे संघटक पदाधिकारी व सदस्य भरतेश पाटील, प्रमोद गुंजीकर, निलेश शहापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते
उपस्थितांना विनय जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आले. येत्या मंगळवार दि. 14 पर्यंत हे प्रदर्शन चालणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले. सर्वांना प्रवेश मोफत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

वेदांत फाउंडेशनतर्फे गवळीवाडा गाव दत्तक

Spread the love  ग्रामविकास प्रकल्पाचा शुभारंभ; शिक्षण, सामाजिक उपक्रमांतून गावाचा कायापालट करण्याचा संकल्प खानापूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *