Monday , September 7 2026
Breaking News

वास्तुशास्त्राच्या ज्ञानातून सकारात्मक वातावरण निर्मितीचा संदेश

Spread the love

 

बेळगाव : क्रेडाई वुमेन्स विंग, बेळगावतर्फे सिटी कोऑर्डिनेटर करुणा हिरेमठ आणि सेक्रेटरी सविता सायनेकर यांच्या पुढाकारातून काकती येथे वास्तुशास्त्र विषयावरील विशेष ज्ञानवर्धक सत्राचे आयोजन करण्यात आले. पंचतत्त्व अ‍ॅस्ट्रो अँड वास्तुचे विनायक विजय ओगले यांनी उपस्थितांना वास्तुशास्त्रातील विविध तत्त्वांची सविस्तर माहिती दिली.

महिलांना घर तसेच व्यावसायिक जागांचे योग्य नियोजन, दिशांचे महत्त्व आणि सकारात्मक वातावरण निर्मितीबाबत मार्गदर्शन करणे, हा या सत्राचा प्रमुख उद्देश होता. ओगले यांनी घरातील विविध दिशांचे महत्त्व, जागेचे नियोजन, नैसर्गिक प्रकाश व वायुवीजन तसेच घरातील सकारात्मक वातावरणासाठी आवश्यक बाबी उदाहरणांसह स्पष्ट केल्या.

आधुनिक जीवनशैलीमध्ये वास्तुशास्त्राच्या तत्त्वांचा समतोलपणे वापर कसा करता येईल, तसेच वास्तुशास्त्राचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमाच्या नियोजनाची आणि समन्वयाची जबाबदारी इव्हेंट कोऑर्डिनेटर्स अनुश्री बैलूर आणि श्रेया माळी यांनी यशस्वीपणे पार पाडली. क्रेडाई वुमेन्स विंगच्या सदस्यांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे सत्र अत्यंत माहितीपूर्ण, उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इंग्रजी विषयाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *