Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

सीमाभागात “SIR” फॉर्म मराठीत उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला म. ए. समितीचे स्मरणपत्र

  बेळगाव : सीमाभागातील विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेसाठी गणना (Enumeration) फॉर्म मराठी भाषेतही उपलब्ध करून द्यावेत, तसेच तोपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी करत मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; शिंगणापूरसह १९ बंधारे पाण्याखाली, पंचगंगेची पाणीपातळी झपाट्याने वाढली

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून, गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सरासरी १९.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा, वारणा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. …

Read More »

डॉक्टर दिनानिमित्त इंजिनिअर-समाजसेवक प्रसाद पाटील यांचा केएलई संस्थेकडून गौरव

  खानापूर : डॉक्टर दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक योगदान दिल्याबद्दल गर्लगुंजी ग्रामपंचायतीचे सदस्य व व्यवसायाने इंजिनिअर असलेले प्रसाद विठ्ठल पाटील यांचा केएलईच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. डॉक्टर नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवेसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या प्रसाद पाटील यांच्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला. प्रसाद पाटील हे …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सततचा कामाचा ताण, विधिमंडळाच्या अधिवेशनातील व्यस्त कार्यक्रम, व्हायरल ताप …

Read More »

धुवांधार पावसाचा पहिलाच तडाखा! इस्लामिया हायस्कूलची संरक्षण भिंत कोसळली; मोठा अनर्थ थोडक्यात टळला

  बेळगाव : शहर आणि परिसरात शुक्रवारपासून सुरू झालेल्या धुवांधार पावसाने पहिल्याच झटक्यात प्रशासनाच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडू लागले असून ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अशातच कॅम्प परिसरातील इस्लामिया हायस्कूलची संरक्षण भिंत शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजता जोरदार आवाज करत कोसळली. सुदैवाने …

Read More »

“SIR” संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या मराठा मंदिर येथे महत्त्वपूर्ण बैठक

  बेळगाव : सीमाभागात सुरू असलेल्या विशेष मतदार फेरनिरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि मराठी भाषिक नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. ही बैठक रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे होणार आहे. सीमाभागात …

Read More »

पिरनवाडीतील सोन्याच्या दुकानफोडीचा छडा; गोव्यातील 18 वर्षीय आरोपी अटकेत, 4.78 लाखांचे दागिने जप्त

  बेळगाव : पिरनवाडी येथील कामाक्षी ज्वेलर्समध्ये झालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा उलगडा करण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले असून, गोव्यातील 18 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून ₹4 लाख 78 हजार किंमतीचे 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मे 2026 रोजी शास्त्रीनगर, …

Read More »

नागरिकांच्या तक्रारींसाठी ‘प्रजा सेवा’ नवे खाते; महिन्यातून दोन दिवस मंत्री थेट जनतेच्या भेटीला

  बेंगळुरू : राज्यातील नागरिकांच्या तक्रारी व समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत ‘प्रजा सेवा’ या नावाने स्वतंत्र खाते स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून, या खात्यासाठी स्वतंत्र मंत्र्याचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. या नव्या उपक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री महिन्यातून दोन दिवस थेट नागरिकांच्या …

Read More »

प्रथम स्मृतिदिनानिमित्त : संघर्ष, कर्तृत्व आणि माणुसकीचा सुगंध जपणारे कै. पांडुरंग शांताराम हेब्बाळकर

  “चंदनापरी देह झिजविला, कष्टातून संसार फुलविला… शून्यातून विश्व उभे केले, पण स्वतःसाठी जगणे मात्र विसरलात…” दिनांक ४ जुलै २०२५ रोजी आम्हा सर्वांना कायमचे पोरके करून जाणारे माझे थोरले बंधू कै. पांडुरंग शांताराम हेब्बाळकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. पांडुरंग यांचा जन्म १० मार्च १९७० रोजी तिवोली …

Read More »

दर शुक्रवारी धावणार पंढरपूर–यशवंतपुर एक्सप्रेस; मिरज–बेळगाव–हुबळी मार्गे प्रवासाला नवी जोडणी

  बेळगाव : नैऋत्य रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाची घोषणा केली असून पंढरपूर ते यशवंतपुर (बेंगळुरू) दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वे मिरज, बेळगाव आणि हुबळी मार्गे धावणार असून दर शुक्रवारी एकदा ही सेवा उपलब्ध राहणार आहे. सुमारे 880 किलोमीटरचा प्रवास ही गाडी अंदाजे 15 तास …

Read More »