

बेंगळुरू : कर्नाटक सरकारने गुटखा आणि तंबाखूयुक्त पान मसाल्यावरील बंदी लागू केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अधिकाऱ्यांना बंदीचा आदेश मागे घेण्याचे निर्देश दिले. भाजप तसेच काँग्रेसच्या काही आमदारांनी या निर्णयाला विरोध करत सुपारी उत्पादक शेतकऱ्यांवर आणि बाजारपेठेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
१० ऑगस्ट रोजी अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कर्नाटक सरकारने गुटखा, पान मसाला तसेच तंबाखू किंवा निकोटीनयुक्त इतर उत्पादनांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घातली होती.
मात्र, सुपारी उत्पादक शेतकऱ्यांचे हित आणि सार्वजनिक आरोग्य या दोन्ही बाबींमध्ये संतुलन राखण्याची मागणी होत असताना सरकारने बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta