Monday , August 17 2026
Breaking News

लॉरी-दुचाकीची भीषण धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर शहरातील बेल्लद-बागेवाडी रस्त्यावर लॉरी आणि दुचाकीची भीषण धडक होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. प्रविण रामाप्पा हिरेकुरबर (वय 35) असे मृताचे नाव आहे. ते कब्बूर शहरातील हिरेकुरबर येथील रहिवासी होते.

प्रविण हे शहरातून घरासाठी साहित्य खरेदी करून दुचाकीवरून आपल्या घराकडे परतत असताना हा अपघात झाला. लॉरीची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने प्रविण यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *