Monday , August 17 2026
Breaking News

‘तिरंगा ऑन व्हील्स’ सायकल रॅलीतून देशभक्तीचा संदेश; तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

Spread the love

 

बेळगाव : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या वतीने बेळगावमध्ये ‘तिरंगा ऑन व्हील्स’ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. भारतीय लष्कराच्या पुढाकारातून झालेल्या या रॅलीत विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच लष्करी अधिकारी, जेसीओ आणि जवानांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सुमारे २० किलोमीटरची ही रॅली मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरपासून येळ्ळूर किल्ल्यापर्यंत काढण्यात आली. बेळगाव स्टेशन कमांडर तथा द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. विशेष म्हणजे ब्रिगेडियर उपाध्याय यांनी स्वतः तरुण सायकलस्वारांसोबत सायकल चालवत रॅलीत सहभाग घेतला.

राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक २ आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड स्कूल, बेळगाव येथील विद्यार्थी व शिक्षक रॅलीत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

लष्कराच्या अधिकारी, जेसीओ आणि जवानांनीही विद्यार्थ्यांसोबत सायकल चालवत सहभाग नोंदविला. त्यामुळे विद्यार्थी आणि लष्करी जवानांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

‘तिरंगा ऑन व्हील्स’ ही केवळ सायकल रॅली न राहता भारतीय लष्कर, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांना जोडणारा देशभक्तीचा उपक्रम ठरला. स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रॅलीने तरुणाईमध्ये देशभक्ती, शिस्त आणि तंदुरुस्तीचा संदेश पोहोचवत उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *