Monday , September 7 2026
Breaking News

श्री समर्थ महिला मंडळातर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Spread the love

 

बेळगाव : लक्ष्मी नगर, हिंडलगा येथील श्री समर्थ महिला मंडळातर्फे शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी प्राचार्य डॉ. जरली, प्राचार्य प्रवीण चांदीलकर, मुख्याध्यापिका सौ. वासंती लोखंडे तसेच श्री. रोहित देसाई यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला मंडळाच्या सदस्यांच्या मुला-मुलींनी विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनिता दरेकर यांनी केले. मंडळाच्या अध्यक्षा सौ. नीला पाटणेकर यांनी श्री समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधमधील गुरु महिमा, गुरूंचे कार्य तसेच गुरु आणि सद्गुरू यांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

सौ. मीना मोकाशी, सौ. मनीषा गावडे, सौ. दीप बेली आणि सौ. निरुपमा हरिचंदन यांनी गुरुमहिमेचे सादरीकरण केले. सौ. भारती औंधकर यांनी उपस्थित मान्यवरांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.

सौ. शशिकला जरली यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री समर्थ महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. उत्साहपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा सोहळा संपन्न झाला.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इंग्रजी विषयाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *