
बेळगाव : येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना म. ए. युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवारी ( दि.८) करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष दीपक पाटील होते.
प्रारंभी मुख्याध्यापक एस. जी. वरपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य एम. बी. गुरव यांनी युवा समितीतर्फे सुरू असलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. सीमाभागातील मराठी शाळा टिकाव्यात, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी दहा वर्षांपासून शैक्षणिक साहित्य वाटपाचे काम सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी एसडीएमसी सदस्य शिवाजी शिंदे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शांताराम गुरव, शैलेश पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta