Sunday , August 16 2026
Breaking News

दोन महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या; आईसह चौघांना अटक

Spread the love

 

बिदर : दोन महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला आईसह कुटुंबातील सदस्यांनी विहिरीत फेकून देत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना औराद तालुक्यातील वडगाव येथे उघडकीस आली. मुलगा बेपत्ता झाल्याचे सांगून वडिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. रविवारी हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, देगलूर तालुक्यातील कावळगड येथील संजय यांचा विवाह वर्षभरापूर्वी वाणीश्री (३२) याच्याशी झाला होता. प्रसूतीनंतर गेल्या दोन महिन्यांपासून वाणीश्री या आपल्या माहेरी वडगाव येथे राहत होती. शनिवारी रात्री त्यांनी पती संजय यांना फोन करून बाळ बेपत्ता झाल्याचे सांगितले. माहिती मिळताच संजय याने वडगाव गाठून बाळाचा शोध घेतला. मात्र, बाळाचा ठावठिकाणा न लागल्याने त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, कुटुंबीयांनी हा प्रकार लपविण्यासाठी कट रचल्याचा संशय पोलिसांना आला. ‘देवाने बाळाला आपल्याकडे नेले’, अशी खोटी माहिती देऊन ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संतपूर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आले.

पोलिसांच्या चौकशीत बाळाची हत्या केल्याची कबुली कुटुंबीयांनी दिल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या माहितीनुसार शोध घेतला असता संगमेश्वर मंदिराजवळील विहिरीत दोन महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला.

या प्रकरणी संतपूर पोलिसांनी बाळाची आई वाणीश्री (३२), मामा संतोष मस्कले (३५), आजोबा बसाप्पा मस्कले (७०) आणि आजी रत्नम्मा (६५) यांना अटक केली आहे.

बाळाची देखभाल करणे शक्य नसल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या घटनेमागे अंधश्रद्धेचा संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. हत्येचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार असून, संतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक विधान परिषदेच्या सभापती पदी गायत्री शांतेगौडा

Spread the love  बेंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्या ए. व्ही. गायत्री शांतेगौडा यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *