Sunday , August 16 2026
Breaking News

खडेबाजार कॉर्नरमधील उघड्या गटारीमुळे अपघाताचा धोका

Spread the love

 

बेळगाव : शहरातील खडेबाजार कॉर्नर परिसरात रस्त्याच्या मधोमध असलेली उघडी गटार नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे. या गटारीत मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात अस्वच्छतेची समस्याही निर्माण झाली आहे.

या मार्गावर दुचाकींसह इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. गटाराचा मोठा भाग उघडा असल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाशाची कमतरता असल्यास एखादे वाहन या उघड्या गटारीत पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने गटारीतील कचरा हटवून उघडा भाग झाकावा आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी व कन्नड शाळांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Spread the love  मच्छे : येथील सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळा व कन्नड प्राथमिक शाळेच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *