Sunday , August 16 2026
Breaking News

पारदर्शी कारभारामुळे ‘भाग्यलक्ष्मी संस्था’ नावारूपास; सहकाररत्न उत्तम पाटील

Spread the love

 

बोरगाव भाग्यलक्ष्मी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

निपाणी (वार्ता) : स्पर्धेच्या युगात नियोजना अभावी अनेक संस्था अडचणीत येत आहेत. युवा उद्योजक माणिक कुंभार आणि संचालक मंडळाच्या पारदर्शक कारभारामुळे बोरगांव भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्था सहकार क्षेत्रात नावारूपास आली. आहे. सहकारी संस्था टिकवण्यासाठी तारेवरची कसरत आहे, असल्याचे मत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. संस्थेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.
नगरसेवक माणिक कुंभार यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष जावेद चोकावे म्हणाले, संस्थेचे 860 सभासद, 15 लाख 90 हजारावर भाग भांडवल, 8 कोटी 60 लाख रुपयांच्या ठेवी, 5 कोटी 30 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.
गुंतवणूक 3 कोटी 86 लाख रुपये इतकी झाली असून 81 लाख 4 हजार रुपये शिल्लक आहे. अहवाल सालात 19 लाख 2 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळविला असल्याचे सांगितले.
यावेळी नगरसेवक अभय मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले.
सगळेच सभापती प्रदीप माळी, उद्योजक अशोक कुंभार, उपाध्यक्ष श्रीकांत गोलतनावर, संचालक अभय लगारे, कुमार चिपरे, राजेंद्र माळी, विजय गोरवाडे, सलीम अफराज, महादेव कुंभार, दिलीप गोसावी, शोभा चिपरे, लक्ष्मी कुंभार, अण्णा हेरलगे, श्रीपाल जंगठे, अशोक आरगे, यांच्यासह सभासद, कर्जदार, ठेवीदार उपस्थित होते. आर. एस. पचंडी यांनी सूत्रसंचालन केले. अजित कांबळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

स्तवनिधीत स्वातंत्र्यदिन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित बाल विकास मंदिर, पी. जी. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *