Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

जिल्हास्तरीय कबड्डी शांतिनिकेतन, संत मीरा देवेंद्र जीनगौडा शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी, स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, संत मीरा अनगोळ, देवेंद्र जिंनगौडा, शिंदोळी या शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.तसेच कराटे, बुद्धिबळ स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. शाळेच्या माधव सभागृहात या स्पर्धेच्या उद्घाटनाला …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

  बेळगाव : दिनांक 27 जून रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील शिक्षिका संज्योत बांदेकर उपस्थित होत्या. त्यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य याचा थोडक्यात आढावा श्रुतिका गुरव हिने घेतला. …

Read More »

आश्वासनाची आठवण; मराठी परिपत्रके, फलकांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा धाव

  बेळगाव : मराठी परिपत्रके आणि शासकीय कार्यालयांवरील मराठी फलकांच्या अंमलबजावणीबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, तसेच आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी, या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची पुन्हा भेट घेत निवेदन सादर केले. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना २२ जून रोजी …

Read More »

श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिरात सकल मराठा समाजातर्फे गाऱ्हाणे; समाज, शेतकरी आणि पावसासाठी सामूहिक प्रार्थना

  बेळगाव : सर्व समाजबांधव, बळीराजा, शेती आणि राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार, २९ जून रोजी दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिरात पारंपरिक गाऱ्हाणे घालण्याचा धार्मिक कार्यक्रम भक्तीभावाने पार पडला. या प्रसंगी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांनी समस्त मराठा समाज आणि शेतकरी …

Read More »

दड्डी भागातील बेंदूर सण उत्साहात साजरा; बैलांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त

  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील दड्डी परिसरात पारंपरिक बेंदूर सण मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कोट गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची विधिवत पूजा करून कृषी संस्कृतीचे जतन केले. यावेळी शेतकऱ्यांनी बैलांना आंघोळ घालून त्यांना रंगीबेरंगी झुली, माळा, फुलांचे हार व आकर्षक सजावटीने सजवले. बैलांच्या शिंगांना रंग …

Read More »

लेबर कार्डही आता आधारशी जोडणार; बनावट नोंदणीला लगाम, अपात्र लाभार्थ्यांची होणार छाननी

  बेळगाव : शासकीय योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचावा यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांना आधार कार्डची जोडणी अनिवार्य केली जात आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आता बांधकाम कामगारांचे लेबर कार्ड (कामगार कार्ड) आधार कार्डशी लिंक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून, बेळगाव जिल्ह्यातही या …

Read More »

शैक्षणिक वर्षाचा महिना उलटला; ९ हजार शिक्षक भरतीचा अजूनही पत्ता नाही

  बेंगळूरू : नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन महिन्याचा कालावधी उलटला असला, तरी राज्यातील ९ हजार शिक्षक भरती प्रक्रियेला अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच राज्य सरकारने ९ हजार शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात शाळा सुरू होऊन महिना उलटूनही भरतीसंदर्भात कोणतीही ठोस हालचाल दिसून …

Read More »

आजपासून राज्यभर विशेष मतदार यादी पुनर्तपासणी मोहीम; बीएलओंच्या घरोघरी भेटींना प्रारंभ

  बेळगाव : मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राज्यभर मंगळवार, ३० जूनपासून विशेष व्यापक पुनर्तपासणी (एसआयआर) मोहिमेला प्रारंभ होत आहे. या महिनाभर चालणाऱ्या उपक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. या प्रक्रियेदरम्यान बीएलओ प्रत्येक कुटुंबाला विहित नमुन्यातील …

Read More »

मित्राच्या पत्नीसोबत पळून गेल्याच्या रागातून थरार; तरुणाच्या घरावर सशस्त्र जमावाचा हल्ला

  तोडफोड करून रोकड-दागिने व २५ मेंढ्या लंपास बेळगाव : बेळगाव तालुक्यातील भरम्यानट्टी गावात मित्राच्या पत्नीसोबत पळून गेल्याच्या रागातून एका तरुणाच्या घरावर ५० हून अधिक जणांच्या सशस्त्र जमावाने धाडसी हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात घराची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली असून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि …

Read More »

प्रेमप्रकरणातून घरावर हल्ला; तलवारीने वाराचा प्रयत्न, तिघांना अटक

  बेळगाव : प्रेमप्रकरणाच्या वादातून एका कुटुंबाच्या घरावर तलवारी व काठ्यांसह हल्ला करून महिलेच्या हत्येचा प्रयत्न, घराची तोडफोड आणि सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी मारिहाळ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. भरम्यानट्टी येथील भिमप्पा यल्लप्पा नाईक यांनी …

Read More »