Monday , August 17 2026
Breaking News

मराठा मंडळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा वर्षा सहलीत निसर्गसौंदर्याची अनुभूती

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या निपाणी ते रामलिंग पायी प्रवास करून मंदिर परिसर स्वच्छता, वृक्षारोपण करून वर्षा सहलीत निसर्ग सौंदर्याची अनुभूती घेतली. शिवाय पावसाळ्याच्या हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात वर्षा सहलीचा मनमुराद आनंद लुटत, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून वृक्षारोपण केले. विद्यार्थ्यांनी शिस्त, संयम आणि परस्पर सहकार्याची प्रचिती देत हा प्रवास पूर्ण केला.
रामलिंग येथे पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी मंदिर परिसर स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर यरनाळ ते रामलिंग परिसरात वृक्षारोपण केले. वृक्षलागवडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दिवसभराच्या या उपक्रमानंतर सर्वांनी एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर मनोरंजन कार्यक्रमामुळे सहलीच्या आनंदात आणखी रंग भरला. गीत, खेळ, हास्य-विनोद आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन मुख्याध्यापक प्रा. ॲड. डी. डी. हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी व्ही. व्ही. पत्की, एस. डी. साखळकर, जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, अर्चना पाटील, पूजा पाटील, प्रियांका पाटील, धनश्री पाटील, चौगुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *