Sunday , August 16 2026
Breaking News

‘महात्मा बसवेश्वर’ संस्थेला १०.७२ कोटीवर नफा

Spread the love

 

अध्यक्ष किशोर बाली; ६४.५१ कोटी रुपयांची गुंतवणूक

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेला यावर्षी ८ १०.७२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मल्टीस्टेट संस्थेमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संस्थातर्फे इतर ठिकाणी ६४.५१ लाखावर सुरक्षित गुंतवणूक केली आहे. याशिवाय सभासदांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती महात्मा बसवेश्वर संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांनी दिली.
येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात रविवारी (ता.९) झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर प्राणलिंग स्वामी, संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी श्रीकांत परमणे, प्रताप पट्टणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष बाली म्हणाले, “जागृत सभासद, प्रामाणिक संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांमुळेच संस्थेची प्रगती होत आहे. व्यवहार वाढत आहेत.
संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन तांत्रिक ज्ञान रुजवले जात आहे. संस्थेचे २२ हजार ५९ सभासद, २०.३० कोटी रुपयांचे भागभांडवल, ८६.५६ कोटींचा राखीव निधी,६७५ कोटी रुपयांच्या ठेवी, ४९४.५८ कोटी रुपयांचे कर्जवाटप तर ६४.५१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल ४६८६.३३ कोटी असून ८०७.६.कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे.
यावेळी कोल्हापूर येथील विठ्ठल कोतेकर यांचे तणावमुक्त जीवन यशा मागील रहस्य या विषयावर व्याख्यान झाले.
प्रारंभी प्राणलिंग स्वामी आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व रोपाला पाणी घालून सभेचे. उद्घाटन झाले झाली. उज्वल गच्ची व सहकाऱ्यांनी भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला. सुजाता जाधव यांनी बसवचन सादर केले. संचालक सुरेश शेट्टी यांनी लेखापरीक्षण अहवाल सादर केला, तर सीईओ एस. के. आदन्नावर यांनी मागील सभेच्या वृत्तांताचे वाचन केले. यावेळी गुणी विद्यार्थ्यांसह मान्यवरांचा सत्कार झाला. शिवाय विविध शाखांच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
सभेस संचालक प्रताप पट्टणशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, सदाशिव धनगर, दिनेश पाटील, डॉ. एस. आर. पाटील, श्रीकांत परमणे, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया पाटील, सुवर्णा पट्टणशेट्टी, हाल शुगरच्या उपाध्यक्ष गीता पाटील, यांच्यासह संचालक सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *