
निपाणी (वार्ता) : स्वच्छता, पर्यावरण निर्माण करणे जनतेमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासह सामाजिक जबाबदारीची भावना रुजवणे या उद्देशाने येथील जी. आय. बागेवाडी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) युनिटतर्फे ‘स्वच्छता अभियान-२०२६’ चा भाग म्हणून रविवारी (ता.९) आडी गावातील श्री मल्लिकार्जुन मंदिरात एक दिवसीय स्वच्छता शिबिर घेण्यात आले.महाविद्यालयाच्या ११० हून अधिक एनएसएस स्वयंसेवकांनी शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला
मल्लिकार्जुनमंदिराचा परिसर, सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. स्वयंसेवकांनी गटागटाने काम करून परिसरातील कचरा, प्लास्टिकचा कचरा, वाळलेली पाने आणि इतर टाकाऊ वस्तू संकलित करून परिसर स्वच्छ व सुंदर केला.
स्वच्छता मोहिमेसह स्वच्छता आणि आरोग्य, पर्यावरण संरक्षण, कचरा विल्हेवाट, प्लास्टिक वापरावर नियंत्रण आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्या बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही केवळ सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी नाही. नागरिकानी सामाजिक कर्तव्य मानले पाहिजे, असा संदेश स्वयंसेवकांनी दिला. यावेळी मल्लिकार्जुन मंदिराचे पुजारी वासू गुरव, व्आणि मंदिराचे आचार्य बाबासाहेब डांगे, डॉ. आनंद केंचक्कनवर, डॉ. एस. आर. हुन्नरगी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. मोहिमेला बेनाडीतील ग्रामस्थही उपस्थित होते. आणि त्यांनी स्वच्छता मोहिमेत सहकार्य केले. गावकऱ्यांनी स्वयंसेवकांसोबत हातमिळवणी करून मंदिर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याच्या कामात सहभाग घेतला.

Belgaum Varta Belgaum Varta