Monday , August 17 2026
Breaking News

रयत संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त ढोणेवाडीत नेत्र, रक्तदान शिबिर

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या ढोणेवाडी येथील शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार व मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवल्याबद्दल पोवार यांचा शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. पवार यांनी, संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे काम निरंतरपणे सुरू आहे. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करून सत्कार बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी एकनाथ सादळकर, बबन जामदार, सागर माळी,सुभाष खोत, बाबू सांगावे, प्रकाश घाटगे, बाळासाहेब साजणे, रमेश निगवे यांच्यासह शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *