Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

दड्डी भागात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

  दड्डी : दड्डी परिसरात वटपौर्णिमा हा सण सोमवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सलामवाडीसह परिसरातील विविध गावांतील विवाहित महिलांनी पहाटेपासून वडाच्या झाडाजवळ एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली. पतीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी महिलांनी वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून व्रताचे विधी पार पाडले. यावेळी महिलांनी …

Read More »

पतीच्या दीर्घायुष्यासोबत वडाच्या दीर्घायुष्यासाठीही प्रार्थना; सान्सी महिला मंडळाचा पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

  बेळगाव : हिंदू संस्कृतीनुसार पतीला दीर्घायुष्य लाभावे, या श्रद्धेने वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. मात्र अन्नपूर्णेश्वर नगरातील सान्सी महिला मंडळाने या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची अर्थपूर्ण जोड देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. वडाचे रोपटे लावून त्याचे वर्षभर संगोपन करणे आणि दरवर्षी त्याच वृक्षाची पूजा करण्याचा अनोखा …

Read More »

सुर्ल (सुरल) धबधब्यात बुडालेल्या बेळगावच्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

  बेळगावच्या रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नांना यश; मुसळधार पावसामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी खानापूर : गोव्यातील सत्तरी तालुक्यातील सुर्ल (सुरल) धबधब्यात बुडालेल्या बेळगावच्या 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह सोमवारी (29 जून) अखेर शोधून बाहेर काढण्यात आला. मुसळधार पाऊस, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे शोधमोहीम अत्यंत आव्हानात्मक ठरली होती. अखेर बेळगावच्या …

Read More »

खा. संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करुन कारवाई करावी; चंदगड तालुका पत्रकार संघाची मागणी

  चंदगड : पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचा राग मनात धरून खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करत, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात सोमवारी सकाळी चंदगड तहसीलदार …

Read More »

सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीची बैठक लांबणीवर

  मुंबई / बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्याला दिशा देणारी आणि सीमावासीयांच्या अपेक्षांचे केंद्रबिंदू ठरलेली उच्चाधिकार समितीची बैठक ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याने सीमाभागात तीव्र नाराजीची भावना व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, ३० जून रोजी मुंबईतील विधान भवनात होणारी ही महत्त्वपूर्ण बैठक अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आल्याची माहिती …

Read More »

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; अथणीत पती अटकेत

  अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील नंदगाव येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अथणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदगाव येथील श्री अवजीकर मठ परिसरात राहणाऱ्या शोभा परगोंडा सारवाड (वय ३५) यांची त्यांच्या …

Read More »

मुलगा झाल्याच्या आनंदात पार्टी मागण्यावरून वाद; मित्राची दगडाने ठेचून हत्या

  बैलहोंगल : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील वण्णूर गावात मुलगा झाल्याच्या आनंदात पार्टी मागण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला नेसरगी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी हनुमंतप्पा यमनप्पा इतापी हा …

Read More »

जिल्ह्यात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९५.६ टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण

  बेळगाव : राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी जिल्हाभर विशेष लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात ९५.६ टक्के बालकांचे पोलिओ लसीकरण पूर्ण झाले आहे. पोलिओ हा कायमस्वरूपी अपंगत्वास कारणीभूत ठरणारा गंभीर आजार असून त्यापासून …

Read More »

रिमझिम पावसात भक्तिभावाचा दरवळ; वटपौर्णिमेनिमित्त मंदिर परिसरात सुवासिनींची गर्दी

  बेळगाव : पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी केले जाणारे हिंदू संस्कृतीतील पवित्र वटपौर्णिमा व्रत सोमवारी जिल्हाभर मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरे करण्यात आले. रिमझिम पावसाची सतत हजेरी असूनही पारंपरिक वेशभूषा, नटलेला साज-शृंगार आणि हातात पूजेचे साहित्य घेऊन सुवासिनींनी मंदिर परिसर गाठत वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली. …

Read More »

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

  पुणे : राज्यभर संतापाची लाट निर्माण करणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व निर्घृण हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (६५) याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने केलेला गुन्हा “दुर्मीळातील दुर्मीळ” स्वरूपाचा असल्याचे नमूद करत न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. अंतिम निकाल देताना न्यायालयाने आरोपीविरोधातील वैज्ञानिक …

Read More »