Monday , August 17 2026
Breaking News

रेल्वेची धडक बसून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : पुणे-बंगळूर (पी.बी.) मार्गावरील तानाजी गल्ली ओव्हरब्रिजजवळ आज दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास रेल्वेची धडक बसून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. रोहित रमेश पाटील असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच सोशल वर्कर रेस्क्यू टीम, बेळगावचे सदस्य अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, शशिकांत अंबेवाडकर, विकी मेहता, मायकेल पिंटो आणि शुभम हूळी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर सोशल वर्कर टीमच्या मदतीने मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविण्यात आला.

या घटनेप्रकरणी रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, विद्यार्थ्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत माहिती घेण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *