Sunday , August 16 2026
Breaking News

विद्यार्थ्यांनी प्रगती करायची असेल तर मोबाईलपासून दूर राहा : रमेश पाटील

Spread the love

 

सलामवाडी येथे कै. तुकाराम आण्णा पाटील यांच्या ७व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना स्टील ग्लास, पेन व मिठाईचे वाटप

दड्डी : सलामवाडी (ता. हुक्केरी) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत कै. तुकाराम आण्णा पाटील (गुरुजी) यांच्या ७व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना ५० स्टील ग्लास, पेन व मिठाईचे वाटप करण्यात आले.

कै. तुकाराम आण्णा पाटील यांनी याच शाळेत तब्बल ३३ वर्षे शिक्षक म्हणून सेवा बजावत अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे सुपुत्र रमेश तुकाराम पाटील, सून लता पाटील व पत्नी यशोदा पाटील यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रमेश पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांनी जीवनात प्रगती करायची असेल तर मोबाईलपासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष द्यावे. मोबाईलचा आवश्यक तेवढाच वापर करावा. शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित अभ्यास आणि शिस्त या त्रिसूत्रीमुळेच विद्यार्थ्यांना भविष्यात यश मिळू शकते.”

कै. तुकाराम आण्णा पाटील गुरुजी यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता त्यांना खेळ, शिस्त, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचीही शिकवण दिली. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप शेडे यांनी केले, तर ललिता बडिगेर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी एसडीएमसी अध्यक्ष आनंद पाटील, रमेश पाटील, लता पाटील, रत्नदीप पाटील, पूनम पाटील, सोनम पाटील, उदय पाटील, शिवाजी बुवा, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शैक्षणिक साहित्याच्या वाटपासोबतच मोबाईलच्या वाढत्या वापराबाबत विद्यार्थ्यांना देण्यात आलेले मार्गदर्शन हा उपक्रमाचा विशेष संदेश ठरला.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *