Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

येळ्ळूर रस्त्यावरील निसरड आणि बेदरकार वाहतुकीविरोधात ग्रामस्थांचे अशोका बिल्डकॉनला निवेदन; अन्यथा आंदोलनाचा इशारा

  येळ्ळूर: हलगा – मच्छे बायपास या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे रस्त्यावरील अनावश्यक माती, काँक्रिट आणि ऑइलमुळे वाढलेली निसरड, तसेच जड वाहनांच्या बेदरकार वेगामुळे येळ्ळूर मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. पंधरा दिवसांआधी झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील मातीवर घसरून 3 लोकांचा अपघात होऊन गंभीर इजा झाली होती व पुन्हा बुधवारी झालेल्या पावसात …

Read More »

घुमटमाळ मारुती मंदिर आणि बांडगी शैक्षणिक ट्रस्टतर्फे विद्यार्थिनींचा सत्कार

  बेळगाव : “मुलींनो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर डोळसपणे प्रेम करा, आपल्या आई-वडिलांची मान खाली झुकणार नाही असेच वागा, जीवनात आत्मविश्वास, शिस्त, चांगला एटीट्यूड आणि एकाग्रता महत्त्वाची आहे, त्याचबरोबर गुरुनिष्ठा, चांगली संगतही महत्त्वाची आहे” असे विचार सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्ष प्रा स्वरूपा इनामदार यांनी बोलताना व्यक्त केले. येथील श्री घुमटमाळ …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती व श्यामकांत दोरगुडे पारितोषिक वितरण कार्यक्रम ‌‌‌‌बेळगाव: दिनांक 27 जून 2026 रोजी मराठी विद्यानिकेतनचे इयत्ता दहावी व शाळेच्या बारावीतील गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी प्रा. बळवंत पाटील (GIT College), निवृत्त शिक्षक एस.आर. पाटील, शाळेचे अध्यक्ष सुभाष …

Read More »

अंगणवाड्यांतील एलकेजी-युकेजी उपक्रम अजूनही रखडला; सरकारी शाळांच्या पटसंख्येवर परिणाम

  बेळगाव : सरकारी शाळांतील घटती पटसंख्या रोखण्यासाठी आणि बालशिक्षण अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने अंगणवाडी केंद्रांमध्ये मॉन्टेसरी, एलकेजी आणि युकेजी वर्ग सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केली होती. मात्र, दोन वर्षे उलटूनही हा उपक्रम राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात आलेला नसल्याचे चित्र आहे. जून २०२४ मध्ये अंगणवाडी केंद्रांचे उन्नतीकरण करण्याच्या उद्देशाने …

Read More »

रविवारी काव्य लेखन कार्यशाळेला मान्यवरांची उपस्थिती

  बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात काव्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, कविता आणि सर्जनशील लेखनाची आवड असलेल्या नवोदित कवी, विद्यार्थी व रसिकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणप्रेमी सुभाष …

Read More »

अंकली येथून शितोळे घराण्याच्या मानाच्या अश्वांचा आळंदी वारीसाठी प्रवासास प्रारंभ

  बेळगाव : अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा अशा या  मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी अशा 300 किमी प्रवासास सुरवात करण्यात आली. अंकली येथील शितोळे घराण्याकडे १९४ वर्षापासून माऊलीच्या अश्‍वाची परंपरा आहे. या परंपरेनुसार  आषाढी वारीसाठी शितोळे घराण्याचे मानाचे दोन्ही अश्‍व अंकली …

Read More »

उद्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजण्याचे आवाहन

  बेळगाव : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिनानिमित्त रविवारी (दि. २८) जिल्हाभरात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व पात्र बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार असून कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य व …

Read More »

शनिवारच्या शाळेच्या वेळेत मोठा बदल; आता सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० पर्यंतच वर्ग

  बेळगाव : राज्याच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने शाळांच्या शनिवारच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल केला आहे. नव्या आदेशानुसार राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी शाळा सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेतच भरविण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारी शाळांच्या वेळेत मोठी तफावत होती. काही शाळा सकाळी …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज येथील शिवराज विद्यासंकुलचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे उपस्थित होते. यावेळी ‘स्वयंभू यशवंतराव घाटगे: संस्थानिक शाहू महाराज झाले …

Read More »

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘अग्नि सुरक्षा’ प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

    निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित निपाणी येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये येथील अग्निशामक दलातर्फे अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. आणीबाणीच्या प्रसंगी आग आटोक्यात आणण्यासाठी आणि सुरक्षित बाहेर पडण्यासाठी जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे होत्या. प्रारंभी आगीची कारणे, धोके आणि प्रतिबंध …

Read More »