
बेळगाव : पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळ्ळमठ येथील अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी सुधारणा करण्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अंतिम मंजुरी दिली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पाऊस ओसरताच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.
या ठिकाणी वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर एनएचएआयने हा निर्णय घेतला. कायमस्वरूपी काम पूर्ण होईपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने पाण्याचे ड्रम, वाहतूक कोन, परावर्तित मानवी आकृत्या आणि दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी एनएचएआयच्या समन्वयाने या उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहेत. या उपायांमुळे बडेकोळ्ळमठ परिसरातील अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास आयुक्त बोरसे यांनी व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta