Tuesday , August 18 2026
Breaking News

बेळगावच्या युवकांनी जगातील सर्वात उंच मोटरेबल रोडवर फडकविला तिरंगा

Spread the love

 

बेळगाव : बेळगावच्या साहसी युवकांच्या चमूने जगातील सर्वात उंच मोटरेबल रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमलिंगला (Umling La) येथे यशस्वीरीत्या पोहोचून भारतीय तिरंगा फडकवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 19,024 फूट उंचीवर पोहोचत त्यांनी देशभक्ती आणि साहसाचा अनोखा संगम अनुभवला.
या दुर्गम आणि अत्यंत उंच ठिकाणी तिरंगा फडकविण्याचा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असल्याची भावना युवकांनी व्यक्त केली. हिमालयाच्या नयनरम्य पर्वतरांगांमध्ये उभे राहून राष्ट्रध्वजाला सलामी देताना अंगावर रोमांच उभे राहिले. हा प्रवास केवळ पर्यटन किंवा साहसापुरता मर्यादित नसून, जिद्द, चिकाटी, धैर्य आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धाराचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
उच्च उंची, कमी ऑक्सिजन आणि कठीण हवामान अशा अनेक आव्हानांचा सामना करत या युवकांनी आपले ध्येय गाठले. त्यांच्या या यशामुळे बेळगावच्या साहसी युवकांचा गौरव वाढला असून, इतर तरुणांनाही साहसी उपक्रमांसाठी प्रेरणा मिळणार आहे.
या मोहिमेत किरण गोरल, विनायक चौगुले, प्रसन्न चौगुले, ऋषिकेश जाधव, किरण कदम पाटील, नितीन चव्हाण, श्रीशांत चव्हाण आणि सुरज भोसले यांनी सहभाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

Spread the love  महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *