

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथील विद्यार्थी मास्टर रिधान राजेंद्र पाटील आणि मास्टर शौर्य खन्नुकर यांनी कर्नाटक राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा – २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
या स्पर्धेत मास्टर रिधान राजेंद्र पाटील तसेच मास्टर शौर्य खन्नुकर यांनी आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक (Silver Medal) पटकावले. त्यांच्या या यशामागे कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या एस.एम.सी. समितीचे अध्यक्ष प्रा. श्री. आर. के. पाटील, उपाध्यक्ष प्रा. श्री. आर. एस. पाटील, सचिव प्रा. श्री. नितीन घोरपडे, शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील, उपप्राचार्य श्री. मनोहर करडी यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या तायक्वांदो प्रशिक्षिका निकिता सुतार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात आणखी भर पडली असून विद्यार्थ्यांच्या या यशाचा संपूर्ण शाळेला अभिमान वाटत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta