Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

कंग्राळी बी.के. येथील शालेय विद्यार्थी बेपत्ता

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी.के. येथील स्वयंम अमर बसरीकट्टी हा विद्यार्थी शनिवारी दुपारी सुमारे १२ वाजल्यानंतर शाळेतून बाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो अद्याप घरी परतलेला नसल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलाचा शोध घेण्यासाठी नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून प्रयत्न सुरू असून, परिसरातही शोधमोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, …

Read More »

ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम

    बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत आयोजित ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. यावेळी कार्यवाह सुरेंद्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील आणि रविंद्रनाथ जुवळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात आबासाहेब …

Read More »

अन्नभाग्य तांदळाच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी नवा कायदा

नीट प्रकरणावरून मोदी सरकारवर प्रियांक खर्गे यांची टीका बंगळूर : अन्नभाग्य योजनेतील तांदळाची काळाबाजारात होणारी विक्री रोखण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा आणणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी दिली. या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनीयप्पा यांच्याकडे नवीन कायदा करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. बंगळुर येथे …

Read More »

राज्यात दुष्काळाची चाहूल; पिण्याच्या पाण्यासाठी आगाऊ उपाययोजना

  डी. के. शिवकुमार; पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार बंगळूर, ता. २५: आलमट्टी धरण परिसर वगळता राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाची छाया निर्माण झाल्याचे स्पष्ट होत असून, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी सरकारकडून तातडीने आगाऊ उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी …

Read More »

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव : बेळगाव शहरातील केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पथकाने मोठी कारवाई करत खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गांजासह अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे ₹८० हजार किमतीचा गांजा आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ …

Read More »

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या चौघांच्या टोळीचा हुकेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गांजाच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत एका व्यक्तीकडून ६० हजार उकळल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कल्लप्पा माळज, मल्लिकार्जुन जुल्फी, पृथ्वीराज चौहान आणि डेव्हिड तंगेराळ अशी आहेत. …

Read More »

बेळगाव तालुक्यात चोरट्यांचा हैदोस; बिजगर्णीत भरदिवसा घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास!

  ग्रामीण भागात भीतीचे सावट, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह बेळगाव : बेळगाव तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. सोनोली येथे वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून सुमारे १२ लाखांचा ऐवज लुटल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी बिजगर्णी येथे भरदिवसा घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला. अवघ्या काही दिवसांच्या अंतराने …

Read More »

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : शहरवासीयांची तहान भागविणारा राकसकोप जलाशय आता तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. शुक्रवारी जलाशयाच्या पाणीपातळीत आणखी एक फुटाची वाढ झाल्याने जुनी २४७० फूट पातळी पूर्ण झाली असून, आता पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अवघ्या साडेचार फूट पाण्याचीच आवश्यकता आहे. …

Read More »

अमरावतीत आंबोली पब्लिक स्कूलच्या एनसीसी कॅडेट्सची सुवर्ण कामगिरी; राष्ट्रीय थल सैनिक शिबिरासाठी निवड

  रायफल शूटिंगमध्ये सार्जंट श्रीपाद तार्लेकर यांना सुवर्णपदक; CQMS राज बागवे यांचीही राष्ट्रीय स्तरासाठी निवड आंबोली : आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली येथील 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सिंधुदुर्गच्या दोन कॅडेट्सनी अमरावती येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य संचालनालयस्तरीय थल सैनिक शिबिर (TSC-2026) अंतर्गत आयोजित रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेसह सिंधुदुर्ग …

Read More »

35 वर्षांची अखंड परंपरा; विठूनामाच्या गजरात श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात

  टाळ-मृदुंगाचा निनाद, पारंपरिक दिंडी, भजन-कीर्तन आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने परिसर भक्तिमय बेळगाव : “विठू माऊली तू माऊली, जगाची माऊली…” या अभंगाच्या स्वरांसह “ज्ञानोबा… तुकाराम… माऊली…” च्या अखंड गजराने महाद्वार रोड, तिसरा क्रॉस येथील श्री ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर शनिवारी भक्तिरसाने ओथंबून गेला. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेला धार्मिक …

Read More »