Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराला वेग, बुधवारी शपथविधीची दाट शक्यता

  बेंगळुरू : नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे काही दिवस रखडलेला कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिल्लीला रवाना होणार असून, बुधवारी मंत्रिमंडळ विस्तारासह नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या सोमवारी …

Read More »

बेळगावच्या बहुचर्चित उड्डाणपुलाच्या दिशेने निर्णायक पाऊल; धर्मवीर संभाजी चौकात जिओ-टेक्निकल तपासणीला प्रारंभ

  बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बहुचर्चित उड्डाणपूल प्रकल्पाच्या उभारणीच्या दिशेने अखेर निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. धर्मवीर संभाजी चौक येथे मागील दोन दिवसांपासून बॅरिकेड्स उभारून जिओ-टेक्निकल तपासणी आणि माती परीक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, त्यामुळे प्रत्यक्ष उड्डाणपूल उभारणीच्या कामाला …

Read More »

हिरेबागेवाडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १० जणांना अटक, १ लाख २२ हजारांची रोकड जप्त

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथील शगणमट्टी लीफ फार्मजवळ सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १० जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १ लाख २२ हजार १६ रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी काही जण पैशांची पैज लावून ‘अंदर-बाहर’ नावाचा जुगार खेळत असल्याची …

Read More »

बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना बरखास्त; ६० दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश

  बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतील (BDFA) गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय वादावर अखेर पडदा पडला आहे. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेने (KSFA) विद्यमान बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना बरखास्त करून हंगामी समितीची नियुक्ती केली असून, पुढील ६० दिवसांत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या व्यवस्थापन मंडळाच्या …

Read More »

कोरे गल्ली पंच मंडळ व महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

  बेळगाव : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली कोरे गल्ली पंच मंडळ संस्था आणि महाराष्ट्र्र एकीकरण समिती कोरे गल्ली, रामलिंगवडी शहापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील १० वी आणि १२ वी (पीयूसी) गुणवंत विध्यर्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी कोरे गल्ली पंच मंडळाचे सोमनाथ कुंडेकर अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख व्यक्ते …

Read More »

आमदारांचे नाव सांगून धमक्या, पैशांची मागणी; वैतागलेल्या पंचायत कर्मचाऱ्याची पोलिसांत तक्रार

  खानापूर : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुका पंचायतमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत तांत्रिक समन्वयक म्हणून कार्यरत असलेले विश्वनाथ हट्टीहोळी यांनी खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, खानापूरचे आमदार विठ्ठलराव हळगेकर यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सुनील मड्डीमनी आणि श्रीकांत इटगी हे अनेक दिवसांपासून त्यांच्या शासकीय …

Read More »

सीमालढा अधिक तीव्र होणार! न्यायालयासह राजकीय पातळीवर मध्यवर्ती म. ए. समितीची रणनीती

    सीमा समन्वय मंत्र्यांची लवकरच भेट; सुनावणीला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्याला निर्णायक टप्प्यावर नेण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आता न्यायालयीन लढाईबरोबरच राजकीय आघाडीवरही आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित दाव्याच्या सुनावणीला गती मिळावी, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमधील लोकप्रतिनिधींवर सातत्याने दबाव वाढविण्याचा …

Read More »

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे अग्निवीर भरती मेळावा

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे युनिट मुख्यालय कोटा (UHQ) अंतर्गत अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर लिपिक (क्लर्क) आणि अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी भरती मेळावा ७ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. …

Read More »

बहिर्जी शिरोळकर पदवीपूर्व महाविद्यालयात संगणक कक्षाचे उद्घाटन

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय, हंदिगनूर येथे संगणक कक्षाचे उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. शाळा व महाविद्यालय सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कुऱ्हाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव श्री. विक्रम पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून …

Read More »

सेल्फीचा मोह जीवावर बेतला; तीन दिवसांच्या अथक शोधानंतर २५ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला

  बेळगाव/चिक्कोडी : सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून खोल पाण्यात पडलेल्या २५ वर्षीय युवकाचा तीन दिवसांच्या अथक शोधमोहीमेनंतर मृतदेह रविवारी बाहेर काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी युवक पाण्याच्या ठिकाणी सेल्फी काढत असताना त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच …

Read More »